किमान तापमान : 28.3° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.2 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.56°से. - 30.4°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशसर्वोच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना प्रश्न,
नवी दिल्ली, ५ ऑगस्ट – पेगासस प्रकरणी प्रकाशित झालेल्या बातम्यांत करण्यात आलेले आरोप खरे असतील, तर हे प्रकरण गंभीर आहे, असे सांगताना, इस्रायली स्पायवेअरच्या प्रकरणात गुन्हेगारी स्वरूप असलेली तक्रार करण्याचा प्रयत्न केला का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना आज गुरुवारी झालेल्या सुनावणीत विचारला. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली.
सरन्यायाधीश एन. व्ही. रामण प्रमुख आणि न्या. सूर्य कांत यांचा समावेश असलेल्या न्यायासनाने या प्रकरणी नोटिस जारी करण्यास नकार दिला तसेच पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना वैयक्तिकरीत्या पक्ष केलेल्या एका याचिकेवर आक्षेप घेतला.
या याचिकेची प्रत केंद्र सरकारला सादर करण्यात यावी. असे केल्यास केंद्र सरकारच्या वतीने १० ऑगस्टपूर्वी याबाबतची नोटिस स्वीकारण्यास कुणी तरी येऊ शकेल, असे सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले. हे प्रकरण २०१९ साली समोर आले असताना, आताच याबाबत याचिका का दाखल करण्यात आली, असा प्रश्न न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला.
याचिकाकर्त्यांना ज्ञान आहे तसेच ते शिक्षित आहेत. त्यांनी या प्रकरणी आणखी सामुग्री सादर करावी, असे न्यायासनाने वरिष्ठ पत्रकार एन. राम आणि शशिकुमार यांच्या वतीने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांना सांगितले.
हे प्रकरण दोन वर्षांपूर्वी मे २०१९ साली समोर आल्याची माहिती आम्ही दाखल करण्यात आलेल्या याचिकांमध्ये वाचली आहे. त्यामुळे या प्रकरणाशी निगडीत आणखी सामुग्री समोर आणण्याचा प्रयत्न याचिकाकर्त्यांनी करणे आवश्यक आहे. मात्र, या प्रकरणी कोणतीही सामुग्री याचिकाकर्त्यांनी उपलब्ध केलेली नाही, असे आम्ही म्हणणार नाही, असे निरीक्षण नोंदवताना, या वृत्तांवर विश्वास ठेवता येणार नाही, असे आम्ही म्हणणार नाही, असे न्यायासनाने सांगितले.