किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशकेंद्र सरकारने नियम बदलले,
नवी दिल्ली, ५ ऑगस्ट – नागरिकांना वाहन चालक परवाना मिळण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांत अनेक सोपे पर्याय निवडले आहेत. त्यामुळे ही प्रक्रियाही सोपी झाली. आता याच दिशेने आणखीन एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन परवाना जारी करण्याच्या नियमांत बदल केले आहेत. सरकारने जारी केलेल्या नव्या नियमानुसार, वाहन उत्पादक संघटना, एनजीओ आणि खाजगी कंपन्यांनाही प्रशिक्षण केंद्र चालविण्याची परवानगी दिली जाणार आहे. प्रशिक्षणानंतर या संस्थांनाही नागरिकांना वाहन चालवण्याचा परवाना देण्याची परवानगी देण्यात आली आहे.केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने बुधवारी यासंदर्भात नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार, वाहन परवाना जारी करण्याची नवी सुविधा प्रशिक्षण केंद्रासोबतच प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्येही उपलब्ध असेल.
फर्म, एनजीओ, खाजगी कंपन्या, ऑटोमोबाईल असोसिएशन, वाहन उत्पादक संघटना, स्वायत्त संस्था, खाजगी वाहन उत्पादक अशा प्रकारच्या सर्व वैध संस्था वाहन प्रक्षिक्षण केंद्राच्या मान्यतेसाठी अर्ज दाखल करू शकतील, असे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले गेले आहे. या वैध संस्थांकडे केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत निर्धारित जमिनीवर आवश्यक त्या सुविधा असणे गरजेचे राहील तसेच कोणत्याही राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशात हा अर्ज दाखल करता येईल. यासाठी संसाधने व्यवस्थापनाची आर्थिक क्षमता सादर करावी लागेल. केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, राज्य सरकारला या पद्धतीचे चालक प्रशिक्षण केंद्राची मान्यता प्राप्त करण्याच्या पद्धतीशिवाय इतर माहितीचा प्रचार करावा लागेल.
चालक प्रशिक्षण केंद्र उघडण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी अर्ज केल्यानंतर ६० दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असेल. प्रशिक्षण केंद्राला आपला वार्षिक अहवालही आरटीओ किंवा डीटीओसमोर सादर करावा लागेल.