किमान तापमान : 28.48° से.
कमाल तापमान : 29.49° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 4.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.49° से.
27.34°से. - 30.47°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमेलबर्न, २९ डिसेंबर – बॉर्डर-गावस्कर चषकातील पहिल्या कसोटी सामन्यात नामुष्कीच्या पराभवाचा सामना करावा लागल्यानतंर दुसर्या कसोटी सामन्यात कांगारूंचा आठ गड्यांनी पराभव करत ‘रहाणे’च्या नेतृत्वातील भारतीय संघ ‘अजिंक्य’ ठरला आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलियाचा डाव समाप्त झाल्यानंतर भारतापुढे ७० धावा काढण्याचे आव्हान होते, जे भारताने दोन गडी गमावून लीलया पेलले आणि दुसरा कसोटी सामना खिशात घातला. भारतीय गोलंदाजांनी केलेली दमदार कामगिरी आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात काढलेल्या शतकामुळे मिळालेली १३१ धावांची मजबूत आघाडी यामुळे भारताची मेलबर्नच्या सामन्यावर मजबूत पकड बसली होती. मिळालेल्या आघाडीचा लाभ घेत कांगारूंना दबावात ठेवण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले आणि त्यांच्याच भूमीत त्यांना पराभवाची धूळ चारता आली.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने प्रारंभापासूनच आपली चुणूक दाखवली आणि उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आर. अश्विन या गोलंदाजांच्या प्रभावी मार्याने, तसेच सर रवींद्र जडेजा या अष्टपैलू खेळाडूने केलेल्या कामगिरीच्या भरवशावर भारतीय संघाने मेलबर्न सामन्यावर आपली छाप पाडली. नवखा शुभमन गिल हासुद्धा या सामन्यात प्रभावी खेळी करून गेला. दोन्ही डावांत त्याने सुंदर खेळी केली. या विजयाने महेंद्रसिंग धोनीनंतर अजिंक्य रहाणे हा कर्णधार म्हणून आपले पहिले तीनही सामने जिंकणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी अजिंक्यच्या नेतृत्वात भारताचा २०१६-१७ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला कसोटीत ८ गड्यांनी आणि २०१८ साली अफगाणिस्तानविरुद्ध बंगळुरूमध्ये एक डाव आणि २६२ धावांनी भारताचा विजय झाला होता.