किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलदुबई, २८ डिसेंबर – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला दशकाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. या दशकात तिन्ही स्वरूपात कोहलीच्या दमदार कामगिरीच्या पृष्ठभूमीवर आयसीसीने त्याचा ‘सर गारफिल्ड सोबर्स’ म्हणजेच ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटिअर ऑफ द डिकेड्स’ या पुरस्काराने गौरव केला आहे.
आयसीसी पुरस्कारांच्या या कालावधीत कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या काळात सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक अर्धशतकेही ठोकली आहेत. या दशकात कोहलीने २०,३९६ धावा केल्या आहेत, ज्यात ६६ शतके आणि ९४ अर्धशतकांचा समावेश आहे.
यापूर्वी आयसीसीने कोहलीची निवड दशकातील सर्वश्रेष्ठ एक दिवसीय क्रिकेटपटू म्हणून केली होती. या दशकात कोहली एकदिवसीय क्रिकेटमधील एकमेव खेळाडू आहे, ज्याने १० हजारापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रविवारी आयसीसीने विराट कोहलीला या दशकाच्या तिन्ही प्रकारातील संघात स्थान दिले. तसेच आयसीसीने कोहलीला या दशकातील कसोटी संघाचा कर्णधारही बनवले.
धोनीनेही उमटवला ठसा
कोहलीसोबतच माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानेही आयसीसी पुरस्कारावर आपला ठसा उमटवला आहे. धोनीला दशकातील खेळभावना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. २०११ मध्ये नॉटिंघम येथे झालेल्या कसोटी मालिकेत धोनीने सर्वांचे मन जिंकले होते. या सामन्यात पंचानी इंग्लंडचा फलंदाज इयान बेल याला चुकीच्या पद्धतीने धावबाद दिले होते. त्यानंतर धोनीने मोठे मन करीत बेलला पुन्हा फलंदाजीसाठी पाचारण केले होते. धोनीच्या या खेळभावनेमुळे त्याला दशकातील सर्वोत्तम खेळभावना पुरस्कार मिळाला आहे.
स्टिव स्मिथलाही पुरस्कार
ऑस्ट्रेलियाच्या स्टिव स्मिथलाही दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात आले आहे. स्मिथने या दशकात कसोटी क्रिकेटमध्ये २६ शतकांसह ७,०४० धावा काढल्या आहेत. अफगाणिस्तानच्या राशिद खानची दशकातील सर्वोत्तम टी-२० खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये राशिदच्या नावावर सर्वाधिक विकेट आहेत. राशिदची सरासरी १२.६२ इतकी असून, त्याने तीन वेळा चार विकेट तर दोन वेळा पाच विकेट घेतल्या आहेत.
दशकातील सर्वोत्तम महिला एकदिवसीय, टी-२० क्रिकेटपटू आणि रेचेल हेयोई फ्लिटं पुरस्कारावर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने नाव कोरले आहे.