किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल२० व्या शतकातील सर्वश्रेष्ठ खेळाडू,
ब्युनर्स आयस, २६ नोव्हेंबर – जागतिक फुटबॉल जगतातील ‘मॅराडोना’ नावाचा झंझावात बुधवारी शांत झाला. आपल्या उत्स्फूर्त आणि जोमदार आक्रमक खेळाच्या बळावर मॅराडोना जगातील फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला. त्याच्यामुळे जगाला फुटबॉलची भुरळ पडली. मॅराडोनाचा जन्म अर्जेंटिनातील लॅनस येथे ३० ऑक्टोबर १९६० रोजी झाला होता. अर्जेंटिनाचा हा स्टार फुटबॉलपटू १९८० च्या दशकातील सर्वोत्तम फुटबॉलपटू व जगातला सदासर्वकाळातील सर्वोत्तम फुटबॉलपटूपैकी एक होता.
जागतिक फुटबॉल महासंघाने आभासी माध्यमातून मतदान घेत दिएगो मॅराडोनाची निवड केली आणि त्याला २० व्या शतकातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून सन्मानित केले होते.
अनेक लोक केवळ सहाशे दशके स्वप्न पाहू शकतात, ते स्वप्न दिएगो मॅराडोनाने आपल्या आयुष्याच्या केवळ सहा दशकांत साध्य केले. चेंडूवर नियंत्रण ठेवण्याची आणि गोल नोदविण्याची संधी निर्माण करण्याच्या क्षमतेसाठी तो प्रसिद्ध होता. १९८६ साली मॅराडोनाने आपल्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाला विश्वचषक जिंकून दिला होते. या स्पर्धेत त्याने केलेला गोल ‘हॅण्ड ऑफ गॉड’ म्हणून अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. त्याने अर्जेंटिनासह इटली व स्पेनमधील स्पर्धेत विविध क्लबचे नेतृत्व केले. एकंदरीत जादुई खेळाने जगातल्या तमाम रसिकांना वेड लावले होते.
मॅराडोनाने आपल्या आपल्या प्रतिभेची चुणूक लहानपणीच दाखविली. वयाच्या आठव्या वर्षी तो लास सेबोलिटास क्लबमध्ये दाखल झाला. सलग १३६ सामने जिंकत राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकणार्या मुलांच्या फुटबॉल संघात दाखल झाला. पुढे वयाच्या चौदाव्या वर्षी तो अर्जेंटिनाच्या ज्युनियर संघासोबत करारबद्ध झाला. त्यानंतर आपल्या १६व्या वाढदिवसाच्या दहा दिवसांपूर्वी मॅराडोनाने १९७६ साली प्रथम श्रेणी फुटबॉलमध्ये पदार्पण केले. अवघ्या चार महिन्यानंतर त्याने अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय वरिष्ठ फुटबल संघात प्रवेश केला, त्यावेळी तो अर्जेंटिनाचा सर्वात युवा फुटबॉलपटू ठरला.
१९७८ सालच्या विश्वचषक विजेत्या संघातून त्याला वगळण्यात आले असले, तरी तो अजूनही युवा असल्याचे भासत होत. परंतु, पुढल्याच वर्षी त्याने ज्युनियर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत २० वर्षांखालील राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले. १९८१ साली मॅराडोना बोका ज्युनियर्स संघात दाखल झाला आणि त्याने या संघाला अजिंक्यपद जिंकून दिले. त्यानंतर मॅराडोना युरोपकडे वळला आणि १९८२ साली एफसी बासिलोनासोबत खेळू लागला. १९८३ साली त्याने बार्सिलोनाला स्पॅनिश चषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यानंतर तो १९८४ ते ९१ सालादरम्यान एसएससी नेपोली संघाकडून खेळू लागला. या काळात त्याने घवघवीत यश संपादन केले व इटालियन फुटबॉल क्षेत्रात नेपोली संघाला यशाच्या शिखरावर नेले. मॅराडोनाच्या नेतृत्वाखालील नेपोली संघाने लीग विजेतेपद आणि १९८७ साली चषक तसेच १९९० मध्ये पुन्हा लीग विजेतेपद पटकावले. मात्र, अर्जेंंटिनामध्ये मॅराडोनाकडे मादकद्रव्य कोकेन आढळल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आणि याबरोबरच त्याचे नेपोली संघासोबतचे संबंध संपुष्टात आले. या कृतीबद्दल मॅराडोनावर फुटबॉल क्षेत्रातून १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली. त्यानंतर मॅराडोना स्पेनमधील सेव्हिला संघाकडून आणि अर्जेंटिनामध्ये यूवेलच्या ओल्ड बॉईजकडून खेळू लागला. १९९५ साली तो बोका ज्युनियर्स क्लबमध्ये परतला. २५ ऑक्टोबर १९९७ रोजी तो अखेरचा सामना खेळला.
मॅराडोनाची अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघासोबतची कारकीर्द चमकदार राहिली व तो अर्जेंटिनाकडून १९८२, १९८६, १९९० व १९९४ अशा चार विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत खेळला. १९८६ साली मेक्सिकोमध्ये झालेल्या विश्वचषकात त्याच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाने चांगलेच वर्चस्व गाजविले. उपांत्यपूर्व सामन्यात अर्जेंटिनाने इंग्लंडवर २-१ असा विजय नोंदविला. विश्वचषकाच्या इतिहासात त्याने दोन सर्वात संस्मरणीय गोल नोंदविले. त्याचा पहिला गोल हाताने झाले. (पंचांना वाटले की, त्याने चेंडू डोक्याने मारला). हाच ‘गोल हॅण्ड ऑफ गॉड’ नावाने अजूनही फुटबॉलप्रेमींच्या स्मरणात आहे.
उत्तेजक द्रव्य चाचणीत १९९४ साली दोषी आढळल्याने त्याला पुन्हा निलंबित करण्यात आले. त्यामुळे तो विश्वचषकात खेळू शकला नाही. मॅराडोना १९८७ व १९८९ साली दक्षिण अमेरिकन स्पर्धेत जिंकणार्या संघाकडूनही खेळला होता.
एक खंबीर मिडफिल्डर मॅराडोना अर्जेंटिना व दक्षिण इटलीच्या क्लबचा हुकमी खेळाडू बनला. नेपोली क्लबला त्याने श्रीमंत नॉदर्न क्लबवर विजय मिळवून दिला. २१ वर्षांच्या व्यावसायिक फुटबॉल कारकीर्दीत त्याने अधिकृत क्लबसाठी एकूण ४९० गोल नोंदविले. अर्जेंटिना राष्ट्रीय संघासाठी त्याने ९१ सामने खेळले आणि ३४ गोलची नोंद केली. नोव्हेंबर १९८४ साली मॅराडोना क्लाऊडिया व्हिलाफेनसोबत विवाहबद्ध झाला. २००४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. परंतु, मैत्रिपूर्ण संबंध कायम ठेवले. मॅराडोनाला दिएगो सिनाग्रा नामक मुलगा व दालमा नेरिया व गिनिन्ना दिनोराह अशा दोन मुली आहे. गत ३० ऑक्टोबरला मॅराडोनाने आपला ६० वा वाढदिवस साधेपणाने साजरा केला होता.