किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनिरागस आणि भोळ्या चेहर्याच्या आलिया भट्टच्या रक्तातच अभिनय आहे, हे ‘हायवे’ बघताना जाणवत राहाते. ‘जब वुई मेट’आणि ‘रॉकस्टार’सारखे ‘हटके’े चित्रपट देणार्या दिग्दर्शक इम्तियाज अलीचा हा नवा चित्रपट सामाजिक चौकटीचे अदृष्य आवरण फाडतो. अत्यंत संवेदनशील विषयाला अलीने प्रगल्भतेने रुपेरी पडद्यावर मांडण्यासाठी हात घातला आहे. टिपिकल मसाला हिंदी चित्रपटांच्या लाटेत आलेला ‘हायवे’ एखाद्या झुळुकीसारखा आहे. दाक्षिणात्य किंवा हॉलीवूडच्या चित्रपटांचा रिमेक बनविण्याशिवायही नवे काही प्रेक्षकांना देण्याचा अलीचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. सुखाच्या शोधात निघालेली वीरा, आलियाने सुंदर आणि प्रभावी वठवली आहे.
वीरा (अलिया भट्ट) ही एम. पी. त्रिपाठी या दिल्लीतील बड्या प्रस्थाची मुलगी. वीराचे लग्न ठरले आहे. घरात लग्नाची तयारी सुरू असताना, आपल्या होणार्या नवर्याबरोबर फिरत असताना वीराचे अपहरण होते. महावीर भाटी (रणदीप हुडा) आणि त्याच्या साथीदारांनी पैशासाठी तिचे अपहरण केले आहे. महावीर आणि त्याचे साथीदार कंत्राटी गुंड आहेत. दरम्यान, त्यांना पकडण्यासाठी पोलिस मागावर असल्याने वीराला सतत फिरवणार्या महावीरसोबतच्या या प्रवासात ती आपल्या आयुष्यातील काही विचित्र घटना त्याच्यासोबत ‘शेअर’करते.विचारांच्या या देवाणघेवाणीतून दोघांत भावनिक नाते निर्माण होते.पण बाकी तुम्ही थेट मोठ्या पडद्यावरच बघा.
इम्तियाज अलीनेच कथा लिहिली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत नेमके काय पोहचवायचे,हे त्याचे त्याला पक्के माहीत आहे. मोजकी पात्रे,आखीव-रेखीव पटकथा आणि साजेसे संवाद यामुळे चित्रपटाची पकड कुठेही सैल पडत नाही.चित्रपटाचा प्रभाव अधिक परिणामकारक करण्यात छायाचित्रकार अनिल मेहता यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. इतरवेळी रूक्ष वाटणारा महामार्ग त्यांनी उत्तम दाखविला आहे. ऑस्करविजेत्या ए. आर. रेहमानने मोजक्या गाण्यांना चांगले संगीत दिले आहे. आलियाच्या बोलक्या चेहर्याला रणदीपच्या राकट हावभावांनी भूमिकेला अपेक्षित इफेक्ट दिला आहे.परदेशातील स्थळांऐवजी उत्तराखंड, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब-हरयाणा या खास आपल्याच देशातील अप्रतिम निसर्गाचे आल्हाददायक दर्शन चित्रपटात आहे.सध्याच्या हिट चित्रपटाचे समीकरण बदलविणार्या आणि कसदार मांडणी असणारा ‘हायवे’वरचा हा प्रवास रसिकांना नक्कीच पसंत पडेल.