किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 36 %
वायू वेग : 2.25 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.11°से. - 30.98°से.
मंगळवार, 11 मार्च27.91°से. - 29.75°से.
बुधवार, 12 मार्च27.74°से. - 29.8°से.
गुरुवार, 13 मार्च27.25°से. - 28.45°से.
शुक्रवार, 14 मार्च26.61°से. - 29.33°से.
शनिवार, 15 मार्च26.61°से. - 28.1°से.
रविवार, 16 मार्चमुंबई, (२६ नोव्हेंबर) – २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपट कांताराने प्रत्येक सिनेमा चाहत्यांची मनं जिंकली. एकीकडे या चित्रपटाला समीक्षकांनी खूप पसंती दिली, तर दुसरीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांच्या भरपूर टाळ्या मिळाल्या आणि त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला. स्मॉल बजेट कांताराने भरपूर कमाई केली. चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर प्रेक्षक त्याच्या दुसर्या भागासाठी उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत ’कांतारा चॅप्टर वन’च्या फर्स्ट लूकची माहिती समोर आली आहे.
कांटारा चॅप्टर वनचा फर्स्ट लूक २७ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. प्रोडक्शन हाऊस होम्बाळे फिल्म्सनेही त्याची वेळ शेअर केली आहे. कांतारा चॅप्टर वनचा फर्स्ट लूक २७ नोव्हेंबरला दुपारी १२.२५ वाजता सर्वांसाठी उपलब्ध होईल. कांतारा चॅप्टर वन कन्नडसह हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम, बंगाली आणि इंग्रजी भाषेत रिलीज होणार आहे. हा भाग सिक्वेल नसून प्रीक्वल असल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत पहिल्या चित्रपटाची कथा पुढे दाखवली जाणार आहे. पोस्टरसोबत लिहिले आहे- ’हे फक्त प्रकाश नाही, ते तत्त्वज्ञान आहे.’ कांतारा चॅप्टर वन सुद्धा ऋषभ शेट्टीनेच लिहिले आणि दिग्दर्शित केले आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. कांताराचॅप्टरवन ट्विटरवर ट्रेंड करत आहे. एका रिपोर्टनुसार, १६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या कांताराने जगभरात ३९८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.