किमान तापमान : 28.5° से.
कमाल तापमान : 28.83° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.83° से.
27.34°से. - 30.71°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.15°से. - 29.76°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.65°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.1°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.59°से. - 30.7°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 30.37°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१६ फेब्रुवारी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये ’आदी महोत्सवा’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडाही होते. आदिवासी समाजाने निर्माण केलेला श्री अण्णा हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू असेल. पंतप्रधान कार्यालयाने निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी देशातील आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी सातत्याने विविध पावले उचलत आहेत. यासोबतच देशाच्या प्रगतीत आणि विकासात आदिवासी समाजाच्या योगदानाचाही त्यांनी गौरव केला आहे.
’आदी महोत्सव’ हा आदिवासी व्यवहार मंत्रालयांतर्गत ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड चा वार्षिक उपक्रम आहे. यंदा दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर १६ ते २७ फेब्रुवारी दरम्यान याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात २०० स्टॉल्सद्वारे देशभरातील आदिवासी समुदायांचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा दाखवण्यात येणार आहे. या महोत्सवात सुमारे एक हजार आदिवासी कारागीर सहभागी होणार आहेत.