किमान तापमान : 29.05° से.
कमाल तापमान : 29.68° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.68° से.
27.62°से. - 29.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.31°से. - 30.78°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.42°से. - 30.77°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.71°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.24°से. - 29.69°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल=तीन आठवड्यांचे कामकाज ठरले=
मुंबई, [८ मार्च] – राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सोमवार, ९ मार्चपासून प्रारंभ होत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात रखडलेले विविध विषय आणि समस्यांना या अर्थसंकल्पात आता न्याय दिला जाईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचेही भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती सरकारच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे.
नव्याने स्थापन झालेल्या भाजपा-सेना युतीच्या सरकारचे या वर्षातले हे पहिलेच अधिवेशन आहे. आजवर महाराष्ट्रातील जनता आणि शेतकरी यांचे विविध प्रश्न सभागृहात जोरकसपणे लावून धरणारे आता सत्तेत आहेत. त्यामुळे राज्यासमोरील सर्व समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला जाण्याची शक्यता आहे.
९ ते २६ मार्च असे तीन आठवड्याचे कामकाज सल्लागार समितीने ठरविले असले तरी २६ तारखेला पुन्हा काजकाज सल्लागार समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. यात कामकाज संपवायचे की आणखी पुढे वाढवायचे याबाबत निर्णय होईल. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ९ मार्च रोजी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे विधिमंडळात अभिभाषण होणार आहे. त्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते आर. आर. पाटील, शिवसेनेचे बाळा सावंत आणि गोविंदराव पानसरे यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. इतर दिवशी विविध आयुधांच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नासाठी वेळ दिला जाणार आहे.
या अधिवेशनात महाराष्ट्र महानगरपालिका व नगर परिषदा (सुधारणा) विधेयक २०१५, महाराष्ट्र पोलिस (सुधारणा) विधेयक २०१५, नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्रीहुजूर, अपचलनगर साहिब (सुधारणा) विधेयक २०१५, विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंच्या नियुक्तीच्या कालावधीत वाढ करून तो १२ महिन्यांवरून १८ महिने करणारे महाराष्ट्र विद्यापीठ (सुधारणा) विधेयक २०१५ हे चार अध्यादेश विधेयकात रूपांतरित करण्यासाठी सभागृहासमोर सादर केले जाणार आहेत.