किमान तापमान : 29.07° से.
कमाल तापमान : 29.24° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 6.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.07° से.
27.62°से. - 29.79°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.31°से. - 30.78°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.42°से. - 30.77°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.71°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.24°से. - 29.69°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल=दोन महिन्यात ३०० बलात्कार, विनयभंगाची ५०० प्रकरणे=
नवी दिल्ली, [८ मार्च] – महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आणि उपाय करण्यात आल्यानंतरही महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढच होत असल्याचेच दिसून येत आहे. २०१५ च्या पहिल्या दोन महिन्यातच राजधानी दिल्लीत बलात्काराच्या ३०० आणि विनयभंगाच्या ५०० च्या वर घटना उजेडात आल्या आहेत. आज महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली आकडेवारी पाहून राजधानीतील परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे दिसून येते.
शहराचे इतके भीषण वास्तव समोर आले असतानाही, दिल्ली पोलिसांनी मात्र धक्कादायक विधान केले आहे. महिलांवरील बलात्काराच्या घटना वाढलेल्या आहेत, हे खरे असले तरी मोठ्या प्रमाणात महिला आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पोलिसांकडे धाव घेत आहेत आणि ही सकारात्मक बाब आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने म्हटले आहे.
१६ डिसेंबर २०१२ रोजीच्या बलात्काराच्या भीषण घटनेनंतर समाज आता सकारात्मक विचार करू लागला आहे. कायदे बदलले आहेत, अत्याचार निमूटपणे सहन न करता महिला तक्रार दाखल करण्यासाठी समोर येत आहेत. याआधी महिला आपल्या परिवाराच्या प्रतिष्ठेसाठी तक्रार करीत नव्हत्या, असे हा अधिकारी म्हणाला.
या वर्षीच्या पहिल्या दोन महिन्यात बलात्काराच्या सुमारे ३०० प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर, विनयभंग आणि छेडखानीच्या ५०० पेक्षा जास्त घटना उजेडात आल्या आहेत. गेल्या वर्षी १५ डिसेंबरपर्यंत दिल्लीत बलात्काराच्या २०६९ आणि विनयभंगाच्या ४१७९ घटना घडल्या होत्या.