किमान तापमान : 29.09° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.3°से. - 30.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल=मयंक गांधी यांचा आरोप=
नवी दिल्ली, [७ मार्च] – प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याची टीका आपण केल्यानंतर आम आदमी पार्टीतील एक शक्तिशाली गट मी पक्षातून बाहेर पडावे, यासाठी दबाव आणत आहे, असा स्पष्ट आरोप पक्षाचे वरिष्ठ नेते मयंक गांधी यांनी केला आहे.
भूषण आणि यादव यांची अलीकडेच पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला. या कारवाईचा आपण निषेध केला होता. यासाठी पक्षातील काही नेत्यांनी मला बदनाम करण्याची मोहीमच हाती घेतली आहे. मी पक्षविरोधी आणि अरविंद केजरीवालविरोधी आहे, असे चित्रही सोशल मीडियावर रेखाटण्यात येत आहे, असे मयंक गांधी यांनी आपल्या ब्लॉगवर नमूद केले आहे. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनाही या नेत्यांनी अशाच प्रकारे बदनाम केले होते. त्यांनी पक्षातून बाहेर निघावे, यासाठी दबावही आणण्यात आला होता. पण, पक्षाचा राजीनामा न देता त्यांनी या नेत्यांची खेळी त्यांच्यावरच उलटवली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पक्षाने मला एका समितीवरून हटविले आहे. आशीष खेतान आणि त्यांच्या चौकडीतील काही लोक यात सहभागी आहेत. याची फार मोठी किंमत पक्षाला चुकवावी लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.