किमान तापमान : 28.91° से.
कमाल तापमान : 31.63° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 7.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.63° से.
27.62°से. - 32.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल=कासमी यांचे मत=
बिजनौर, [७ मार्च] – आम आदमी पार्टीतील अंतर्गत कलहामुळे स्वच्छ आणि पारदर्शी राजकारणाची अपेक्षा असलेल्या सर्वसामान्य लोकांचा भ्रमनिरास झाला आहे, असे मत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील सहकारी मुफ्ती शामुम कासमी यांनी म्हटले आहेे.
आपला जनतेने सरकार स्थापन करण्यासाठी ऐतिहासिक असाच जनादेश दिला. जनतेला त्यांच्याकडून स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची अपेक्षा होती. पण, पक्षातील कलहाने जनता निराश झाली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची आपच्या राजकीय व्यवहारविषयक समितीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. जे मुद्दे प्रशांत भूषण यांनी उभे केले, तेच मुद्दे मीदेखील उपस्थित केले होते. त्यावेळी जर पक्षाने माझ्या सूचनांकडे लक्ष दिले असते, तर सध्याची परिस्थिती उद्भवली नसती, असे त्यांनी सांगितले.
२०११-१२ मधील अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी असलेले कासमी यांनी आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यात मोजक्याच लोकांनी निर्णय घेतले आणि ज्यावेळी मी पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशनच्या नावाखाली निधी गोळा करण्यावर आक्षेप घेतला तेव्हा केजरीवाल यांनी मला हाकलून दिले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली.