किमान तापमान : 29.81° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 4.76 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.3°से. - 30.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, [५ मार्च] – देशाची राजधानी नवी दिल्लीत प्रचंड जनादेशासह सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीतील अंतर्गत कलहाला गुरुवारी वेगळेच वळण लागले असून, पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निर्देशानुसारच योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या संस्थापक सदस्यांची पक्षाच्या राजकीय व्यवहारविषयक समितीतून (पीएसी) हकालपट्टी करण्यात आल्याचा गौप्यस्फोट पक्षाचे वरिष्ठ नेते मयांक गांधी यांनी केला आहे.
मयांक गांधी यांच्या या गौप्यस्फोटामुळे आपमधील या अंतर्गत कलहाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीएसीचे सदस्य व पक्षाचा महाराष्ट्रातील प्रमुख चेहरा असलेल्या मयांक गांधी यांनी आपल्या ब्लॉगमधून बुधवारी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील माहिती सार्वजनिक केली. कार्यकर्त्यांच्या नावे लिहिलेल्या खुल्या पत्रातून मयांक गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी स्वत:हूनच पीएसीमधून बाहेर पडण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, संयोजक अरविंद केजरीवाल त्यांची हकालपट्टी करण्यावर अडून बसले होते, असा दावा गांधी यांनी केला आहे.