किमान तापमान : 25.86° से.
कमाल तापमान : 26.61° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 1.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.61° से.
24°से. - 28.53°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.61°से. - 28.82°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 28.75°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.01°से. - 28.78°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.12°से. - 27.87°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.59°से. - 28.12°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल=केजरीवालांची कोलांटउडी=
नवी दिल्ली, [२२ एप्रिल] – दिल्लीकरांना मोठमोठी वचने देऊन आणि आपण इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे आहोत, असे चित्र रेखाटून घवघवीत मताधिक्याने दिल्लीच्या सत्तेवर आलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी युटर्न घेत, निवडणूक काळात दिलेल्या सर्वच वचनांची पूर्तता करणे शक्य होणार नसून, ४० ते ५० टक्के आश्वासनांची पूर्तता करण्यावर आपला भर राहील, अशी भूमिका घेतली आहे.
दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला सत्तेचा कौल दिला असून, संपूर्ण पाच वर्षे आम्ही सत्तेवर राहणार आहोत. पण, या पाच वर्षांच्या काळात सर्वच आश्वासने पूर्ण करणे शक्य नाही, असे केजरीवालांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
आपल्या देशातील जनता राजकीय पक्षांना एका निवडणुकीत डोक्यावर घेते आणि पाच वर्षांनंतर जमिनीवरही आणते. आपला देश चंद्रावर पोहोचला असला, तरी देशातील प्रशासन मात्र अजूनही बदलले नाही, असे नमूद करून पाच वर्षांत ४० ते ५० टक्के आश्वासनांची पूर्तता करणेही चांगले काम ठरेल, असे केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, बंडखोर नेते योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, आनंद कुमार आणि अजित झा यांची सोमवारी रात्री पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर पक्षाने मंगळवारीही कारवाई सुरूच ठेवताना, लोकसभेतील पक्षनेतेपदावरून धर्मवीर गांधी यांचाही हकालपट्टी केली. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ आता पक्ष नव्हे, तर ‘खाप पंचायत’ बनली आहे. पक्षातील हुकूमशहा आणि त्यांच्याभोवताल असलेल्या चौकडीमुळे कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे, असा आरोप प्रशांत भूषण यांनीपत्रपरिषदेत केला.
सुरक्षा मागणार
आपण कोणतीही व्हीआयपी सुरक्षा घेणार नाही. आम आदमीप्रमाणेच आपण राहणार आहोत, असे निवडणुकीपूर्वी जाहीरपणे सांगणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता कोलांटउडी घेत स्वत:करिता सुरक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आपमधील शिगेला गेलेले मतभेद, स्वकियांनीच हातात घेतलेला बंडाचा झेंडा आणि जमीन अधिग्रहण विधेयकाविरोधातील आंदोलन या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमे आणि सर्वसामान्य जनतेपासून दूर राहण्यासाठी केजरीवालांना स्वत:साठी विशेष सुरक्षा हवी असल्याची माहिती त्यांच्याच पक्षातील उच्चस्तरीय सूत्राने दिली.
दिल्ली पोलिसांनी केजरीवालांना आंदोलनकाळात प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे ज्या पत्रकारांजवळ ओळखपत्र असेल, केवळ त्यांनाच केजरीवालांपर्यंत जाता येणार आहे. एरवीही त्यांना सर्वसामान्य जनतेपासून आता त्रास होऊ लागला आहे, असे या सूत्राने सांगितले.