किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=इंडिया टीव्ही सी व्होटरच्या जनमत चाचणीचा अहवाल=
नवी दिल्ली, [२ एप्रिल] – इंडिया टीव्ही सी व्होटर यांनी केलेल्या जनमत चाचणीत आसाममध्ये भाजपा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून समोर आला आहे. याआधी एबीपी आणि नील्सन यांनी केलेल्या सर्वेक्षणातून आसाममध्ये भाजपाची सत्ता येणार असल्याचे संकेत मिळाले होतेे.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इंडिया टीव्ही सी व्होटर यांनी केलेल्या जनमत चाचणीत आसाममध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसून १२६ सदस्यांच्या विधानसभेत भाजपा ५५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल, असे म्हटले आहे. गेल्या १५ वर्षापासून राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसला दुसर्या क्रमांकाच्या ५३ जागा मिळणार आहेत. मौलाना बद्रुद्दीन अजमल यांच्या एआययुडीएफला १२ जागांवर समाधान मानावे लागेल. अन्य पक्षांना ६ जागा दाखवण्यात आल्या आहेत.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल कॉंग्रेस दुसर्यांदा सत्तेवर येणार असल्याचे भाकित या सर्वेक्षणातून करण्यात आले आहे. २९४ सदस्यांच्या विधानसभेत तृणमूल कॉंग्रेसला १६० जागा दाखवण्यात आल्या आहेत. डावे पक्ष आणि कॉंग्रेसच्या आघाडीला १२७ जागा मिळणार असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. यात डाव्या पक्षांना १०६ तर कॉंग्रेसला २१ जागा मिळणार असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. भाजपाला ४ तर अन्य पक्षांना ३ जागा दाखवण्यात आल्या आहेत.
तामीळनाडूत जयललिता यांच्या नेतृत्वातील अण्णाद्रमूक आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी होणार असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. २३४ सदस्यांच्या तामीळनाडू विधानसभेत अण्णाद्रमूक १३० तर तर द्रमूक आणि कॉंग्रेस आघाडीला ७० जागा मिळणार असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. अन्य पक्षांना ३४ जागा देण्यात आल्या आहेत.
१४० सदस्यीय केरळ विधानसभेत ८६ जागा जिंकत डावी लोकशाही आघाडी सत्तेवर येणार असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. राज्यात सध्या सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसच्या नेतृत्वातील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला ५३ जागा देण्यात आल्या आहेत. भाजपा आघाडीला फक्त १ जागा देण्यात आली आहे.