किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, [१७ ऑक्टोबर] – कर्नाटक कॉंगे्रसमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी अलीकडेच कर्नाटकातील दुष्काळग्रस्त भागांच्या दौर्यावर गेले असता, राज्य मंत्रिमंडळातील १५ पेक्षा जास्त वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांच्या दौर्याकडे पाठ फिरविली, तर उर्वरित मंत्री व नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हटविण्याची मागणी करणारे निवेदन सोपविले. या बंडाळीची गंभीर दखल घेऊन, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी सिद्धरामय्या यांना समन्स बजावून दसर्यानंतर दिल्लीत येण्याचे फर्मान सोडले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पक्ष आणि सरकारवरील पकड आता सैल झाली असल्याचेच चित्र राहुल गांधी यांना कर्नाटक दौर्यात पाहायला मिळाले. बहुतेक सर्वच मंत्री आणि आमदारांनी राहुल गांधी यांच्या भेटीत सिद्धरामय्या यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते एस. एम. कृष्णा यांनी राज्य कॉंगे्रसमधील अंतर्गत कलहावर सविस्तर अहवाल सोनियांना सादर केला.
सिद्धरामय्या यांनी गेल्या दोन वर्षांच्या काळात राज्यातील दुष्काळी स्थिती, विजेचे संकट आणि शेतकर्यांच्या समस्या हाताळताना अनेक मोठ्या चुका केल्या. त्यांच्या धोरणांवर गुंतवणूकदारही नाराज आहेत. यावर त्यांना स्पष्टीकरण द्यावेच लागणार आहे. दसर्यानंतर ते दिल्लीला जातील आणि सोनिया गांधी यांच्यापुढे आपली भूमिका सादर करतील. त्यानंतर त्यांची या पदावरून उचलबांगडी होण्याचीच शक्यता जास्त असल्याचे पक्षातील सूत्राचे मत आहे.