किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार=
अमरावती, [२१ ऑक्टोबर] – आंध्रप्रदेशची नवी राजधानी म्हणून गुंटूर जिल्ह्यातील अमरावतीची निवड करण्यात आल्यानंतर नव्या राजधानीचा शिलान्यास समारंभ उद्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
आंध्रातील एन. चंद्राबाबू नायडू सरकारने यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कृष्णा नदीच्या किनार्यावर वसलेल्या उदंडरायुनीपालम या गावात होणार्या या सोहळ्यात किमान चार ते पाच लाख लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे, अशी माहिती राज्य सरकारचे सल्लागार पी. प्रभाकर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सुमारे दीड तास उपस्थित राहणार आहेत. विजयवाडा येथून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या या नव्या राजधानीचा शिलान्यास त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अमरावती शहर भूतकाळात कसे होते, सध्या कसे आहे आणि राजधानी म्हणून भविष्यात ते कसे विकसित होणार आहे, याचे सादरीकरण मोदी यांच्यापुढे करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने या समारंभासाठी काही केंद्रीय मंत्री राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील महत्त्वाचे राजकीय नेते, नामवंत व्यक्ती, उद्योगपती आणि विदेशी मान्यवरांनाही निमंत्रित केले आहे. यात सिंगापूर आणि जपानमधील मंत्री व निवडक शिष्टमंडळाचाही समावेश आहे.