किमान तापमान : 30.33° से.
कमाल तापमान : 30.77° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 52 %
वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.77° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=२४ पैकी १७ जागांवर दणदणीत विजय=
लेह, [२४ ऑक्टोबर] – जम्मू-काश्मीर विधानसभेत जोरदार मुसंडी मारल्यानंतर भाजपाने आता या राज्याच्या लेह येथील लडाख स्वायत्त पर्वतीय विकास पालिकेवरही डौलाने आपला झेंडा फडकविला आहे. लेह पालिकेच्या २४ पैकी १७ जागांवर भाजपाने दणदणीत विजय मिळविला आहे.
मावळत्या लेह पालिकेत आतापर्यंत सत्तेवर असलेल्या कॉंगे्रसचा या निवडणुकीत पार धुव्वा उडाला आहे. मावळत्या लेह पालिकेत २२ सदस्य असलेल्या कॉंगे्रस पक्षाला या निवडणुकीत केवळ चारच जागा जिंकता आल्या. एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे. दोन जागांवर नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार विजयी झाले. १९ ऑक्टोबर रोजी लेह पालिकेसाठी मतदान घेण्यात आले होते. तेगार, पानामिक, तांगसे, चुशूल, कुंगयाम, सक्ती, इगू, मार्टसेलांग, थिकसे, चुकोट, अप्पर लेह, फयांग, सु-मार्खा, सासपोल, तामिसगाम, खालसे आणि सूरबचन या जागा भाजपाने जिंकल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या विजयाबद्दल लेहवासीयांचे आभार मानले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, भाजपाच्या विकास कामांवर विश्वास व्यक्त करणारे येथील नागरिक खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत.
विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीतही लडाखची एकमेव जागा कॉंगे्रसच्या ताब्यातून खेचून आणली होती.