किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल=भाजपाचा सवाल, सिद्धरामय्यांच्या राजीनाम्याची मागणी=
नवी दिल्ली, [१२ नोव्हेंबर] – ज्येष्ठ साहित्यिक एम. एम. कलबुगीं यांची हत्या कर्नाटकातच झाली असताना, त्याचे खापर केंद्र सरकारवर फोडून देशात असहिष्णुतेची स्थिती निर्माण झाल्याची ओरड करणार्या कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी विश्व हिंदू परिषदेच्या दोन नेत्यांच्या मृत्यूप्रकरणी राज्यातील कॉंगे्रस सरकारविरुद्ध मार्च काढून, आपल्या सरकारला बाहेरचा रस्ता दाखविणार आहेत काय, असा संतप्त सवाल भाजपाने आज गुरुवारी केला.
कलबुर्गी यांच्या हत्येशी भाजपाचा कुठलाच संबंध नसताना आणि देशात कुठेही असहिष्णुता नसताना, सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रपती भवनापर्यंत मार्च नेला होता. आता त्यांचीच सत्ता असलेल्या कर्नाटकात टिपू सुल्तान जयंतीविरोधात झालेल्या आंदोलनात विहिंपच्या दोन नेत्यांचा मृत्यू झाला. यासाठी सिद्धरामय्या सरकारला जबाबदार धरून सोनिया गांधी या सरकारच्या बरखास्तीसाठी राजभवनापर्यंत मार्च काढणार आहेत काय, अशी विचारणा भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
कर्नाटकातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असा आरोप करताना भाजपाचे खासदार प्रताप सिम्हा आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीश कर्नाड यांचीही कुलबर्गी यांच्यासारखीच अवस्था करण्याची धमकी देणारे कोण आहेत, याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पात्रा यांनी केली. सिद्धरामय्या यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
गोमांस खाण्यावरून ज्या दादरी येथे हत्याकांड घडले, ते उत्तरप्रदेशात आहे आणि कलबुर्गी यांची हत्या कर्नाटकात घडली. पण, कॉंगे्रसने मात्र या दोन्ही घटनांवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला बदनाम केले. देशात असहिष्णुतेची स्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र रेखाटले, असा आरोप पात्रा यांनी केला.