|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.01° C

कमाल तापमान : 33.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 38 %

वायू वेग : 5.69 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.08°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.38°C - 31.29°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.82°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.01°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.9°C - 32.28°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.21°C - 30.5°C

sky is clear
Home » आरोग्यवर्धिनी, ठळक बातम्या » व्यायाम करा, मधुमेह पळवा!

व्यायाम करा, मधुमेह पळवा!

  • आज जागतिक मधुमेह दिन
  • •भविष्यात भारत होणार मधुमेहींची राजधानी
  • जगात १८० दशलक्ष रुग्ण
  • देशात २०२५ पर्यंत तिप्पट संख्या

shugar insulinनागपूर, [१३ नोव्हेंबर] – मनुष्याला हळूहळू पण नियमितपणे संपविणारा आजार अशीच मधुमेहाची नकारात्मक व्याख्या करण्यात येते. मात्र, नियमित जीवनशैली, संतुलित आहार आणि दररोज किमान अर्धा तास व्यायाम, या त्रिसूत्रीच्या आधारे मधुमेहाला दूर ठेवता येऊ शकते, असे देशविदेशात झालेल्या विविध संशोधनांतर्गत स्पष्ट झाले आहे. १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो. पूर्वी फक्त गर्भश्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांनाच होणार्‍या या आजाराने आज सर्वस्तरांतील माणसांना विळखा घातला आहे. याचे स्वरूप एवढे भयावह झाले आहे की, भविष्यात भारत मधुमेहींची राजधानी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मधुमेहाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. गॅस्टेशनल डायबिटिज हा गर्भवती स्त्रियांमध्ये होण्याची शक्यता अधिक असते. त्याचे आणि टाईप-१ चे प्रमाण हे साधारण ५ ते ७ टक्क्यांच्या आसपास असते. मात्र, टाईप-२ या मधुमेहाचे प्रमाण जागतिक स्तरावर मोठे म्हणजे साधारण ९० ते ९५ टक्क्यांच्या घरात आढळते. जगात आजघडीला साधारणपणे १८० दशलक्ष इतके मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि एकूण मृत्यूंपैकी ५ टक्के मृत्यू मधुमेहामुळे होतात. १९९५ मधील एका संशोधनानुसार भारतातील मधुमेही रुग्णांची संख्या साधारण २० दशलक्ष इतकी आढळली. सन २०२५ पर्यंत ती तिप्पट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, हा तर धोक्याचा इशारा आहे.
का होतो मधुमेह?
मधुमेह होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये अनियमित जीवनशैली, असंतुलित आहार किंवा जंक फूड खाणे, मानसिक तणाव, नैराश्य अथवा चिंता, तसेच या सर्व कारणांनी वाढणारे वजन यांचा समावेश आहे. त्यामुळे मधुमेहाचे आपल्या आयुष्यातील आगमन रोखावयाचे असेल तर त्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे किंवा वाढलेले वजन किमान ५ ते ७ टक्क्यांनी घटविणे हा एक प्रमुख उपाय सांगितला जातो. यासाठी आठवड्यातून किमान पाच दिवस ३० मिनिटांचा व्यायाम किंवा चालणे, सायकल चालविणे हे अत्यावश्यकच असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
त्याखेरीज आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत शक्य तितका नियमितपणा सांभाळण्याचा प्रयत्न करणे, जसे जेवणाच्या वेळा सांभाळणे, अवेळी खाणे, फास्टफूड खाणे टाळावे. संतुलित आहार आणि व्यायामात सातत्य ठेवून वजनावर नियंत्रण ठेवले की मधुमेहाला दूर ठेवणे अशक्य नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मधुमेहाची लक्षणे
अनेक रुग्णांमध्ये मधुमेह हा छुपा शत्रु असतो. याचाच अर्थ असा की, अशा व्यक्तींमधे कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. इतर आजाराची तपासणी करताना नियमित वैद्यकीय तपासणीत मधुमेह आढळून येतो.
• खूप तहान लागणे, वारंवार अथवा रात्री लघवीला जावे लागणे, भूक जास्त लागून देखील जेवण न जाणे, किंबहुना वजन घटणे आणि अशक्तपणा जाणवणे.
• निरनिराळ्या अवयवांचे इन्फेक्शन उदा. त्वचा (पुरळ, गळवे, खाज), मूत्रमार्ग (लघवीला जळजळ/आग, लघवीच्या जागी खाज येणे, जागी लाल होणे), श्‍वसनमार्ग व फुफ्फुसे (सायनसचे विकार व टी.बी) इत्यादी.
• मधुमेहाचा इतर अवयवांवर झालेला परिणाम पुढील लक्षणांनी समजतो. कमजोर नजर /अंधत्व, मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे होणारी विविध लक्षणे इत्यादी.
• या खेरीज मधुमेहींना अर्धांगवायू, हृदयविकाराचा झटका याची शक्यता आधिक असते.
लहान मुलांमध्ये वाढताहेत आजार
भारतातील ६६.११ टक्के मुलांच्या रक्तातील साखरेची पातळी अनियमित आढळून आली. पॅन-इंडिया संस्थेने आज जागतिक मधुमेह दिनाच्या पूर्वसंध्येला ही आकडेवारी जाहीर केली आहे. अर्थात ही आकडेवारी पश्‍चिम विभागाची आहे. तीन वर्षांच्या एकूण १७००० मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यातील ५१.७६ टक्के मुलांच्या (पुरुष) शरीरात साखरेची धोकादायक पातळी आढळून आली. मधुमेहाच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
इन्सुलिन आणि मधुमेह
मधुमेहाच्या आजाराबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. फेड्रिक बॅण्टिंग यांनी चार्ल्स बेस्ट यांच्या सहकार्याने ही कल्पना प्रथम मांडली होती. पुढे १९२२ मध्ये इन्सुलिनचा शोध लागला. त्यामुळे बॅण्टिंग यांच्या वाढदिवशी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय मधुमेह संघ आणि जागतिक आरोग्य संघटनेने घेतला. जगात सर्वप्रथम १९९१ साली जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात आला.
मधुमेह म्हणजे रक्तातील ग्लुकोज वाजवीपेक्षा जास्त असलेली अवस्था. ग्लुकोज हे शरीरातील प्रमुख इंधन असल्याने शक्ती निर्माण करायला याचा वापर होतो.

Posted by : | on : 14 Nov 2015
Filed under : आरोग्यवर्धिनी, ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g