किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली चर्चा=
नवी दिल्ली, [१६ नोव्हेंबर] – नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांना सत्तासिंहासनापर्यंत पोहोचविण्यात महत्वपूर्ण योगदान देणारे प्रशांत किशोर यांच्याकडे आता कॉंग्रेसचेही लक्ष गेले आहे. आसाम विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांची सेवा घेण्याचा विचार कॉंग्रेसमध्ये सुरू आहे.
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी प्रशांत किशोर यांनी सांभाळली होती. तोपर्यंत प्रशांत किशोर यांना देशात फार लोक ओळखत नव्हते. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर प्रशांत किशोर यांची देशवासीयांना ओळख झाली.
पहिल्या यशानंतर प्रशांत किशोर यांच्याकडे जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे लक्ष गेले. त्यांनी प्रशांत किशोर यांच्याकडे आपल्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी सोपवली. बिहारची निवडणूक नितीशकुमार यांच्यासाठी सोपी नव्हती. मात्र, हे आव्हान पेलण्यात प्रशांत किशोर यांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही आणि नितीशकुमार यांना पुन्हा एकदा सत्तासिंहासनावर बसवण्यात ते यशस्वी झाले. यामुळे त्यांच्या नावाची देशभर चर्चा झाली.
प्रशांत किशोर ज्याचे काम घेतात, त्याला सत्तेच्या शिखरावर बसवतात, अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. त्यामुळे कॉंग्रेसचेही त्यांच्याकडे लक्ष गेले. देशातील फार कमी राज्यात आता कॉंग्रेसची सत्ता आहे. त्यात आसाम आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत देशात जेवढ्या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या, त्यात कुठेही कॉंग्रेसला चांगले यश मिळाले नाही. उलट महाराष्ट्र आणि हरयाणातील सत्ता कॉंग्रेसला गमवावी लागली. आसाममध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक आहे आणि कोणत्याही स्थितीत कॉंग्रेसला आसाममधील सत्ता कायम ठेवायची आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रशांत किशोर यांची सेवा घेण्याची सूचना आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना केली. त्यानुसार तरुण गोगोई यांनी नुकतीच प्रशांत किशोर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्रशांत किशोर यांनी आपला होकार अद्याप गोगोई यांना दिला नाही.
आसामसोबतच पश्चिम बंगालमध्येही विधानसभेची निवडणूक आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही प्रशांत किशोर यांची सेवा घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांची प्रशांत किशोर यांच्यासोबत चर्चाही झाली. एकाचवेळी दोन विधानसभा निवडणुका असल्यामुळे प्रशांत किशोर कॉंग्रेसचे काम करण्यास होकार देतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कॉंग्रेसची स्थिती आसाममध्ये आता पहिलेसारखी राहिली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाने आसाममध्ये सात जागा जिंकल्या आहेत. त्यातच आसाममधील कॉंग्रेसच्या ९ आमदारांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे कॉंग्रेसची स्थिती आणखी खराब झाली आहे. राज्यात कॉंग्रेसचे ७८ आमदार असून ९ जणांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या ६९ वर आली आहे. विशेष म्हणजे यातील ४ आमदारांना कॉंग्रेसने पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांखाली आधीच पक्षातून निलंबित केले आहे, तर ५ जणांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.