किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल=हरीश रावत यांचा कॉंग्रेसला घरचा अहेर=
हरिद्वार, [२० नोव्हेंबर] – ‘गोहत्या करणे हे सर्वात मोठे पाप आहे. हे पाप करणारी व्यक्ती देशाची गुन्हेगारच आहे. अशा सर्व गुन्हेगारांना देशाबाहेरच हाकला,’ वरीलप्रमाणे रोखठोक आणि कठोर वक्तव्य करणारी व्यक्ती भाजपा किंवा संघ परिवाराची असेल असा तुमचा समज होण्याची शक्यता आहे. पण, थांबा…हे दणकेबाज उद्गार आहेत उत्तराखंडचे कॉंग्रेसी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे. रावत यांच्या या सुस्पष्ट भूमिकेमुळे कॉंग्रेस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. गोहत्येच्या मुद्यावरून आतापर्यंत भाजपाच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करणार्या कॉंग्रेसला आज रावत यांनी घरचा अहेर दिला आहे. आजपर्यंत या मुद्यावर भाजपाने घेतलेल्या भूमिकेचे त्यांनी समर्थनच केले आहे. गोपाष्टमीनिमित्त शुक्रवारी आयोजित केलेल्या एका समारंभात ते बोलत होते. ‘गोमातेचा वध करणारी व्यक्ती, मग ती कोणत्याही धर्माची असली तरीही तिच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच गोमातेच्या रक्षणार्थ आम्ही मुळीच मागेपुढे पाहणार नसून कोणत्याही थराला जाऊ’, असा खणखणीत इशारा दिला.
उत्तराखंड हे राज्य गोहत्याबंदीचा प्रस्ताव देणारे पहिले राज्य असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. गायी पाळण्यासाठी जमीन देणारे आणि गायीच्या चार्याची व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करणारे हे पहिलंच सरकार असल्याचेही त्यांनी म्हटले.
विशेष म्हणजे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही रावत यांच्याप्रमाणेच वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर कॉंग्रेसने टीकेची झोड उठविली होती. मात्र, मुख्यमंत्री हरिश रावत यांनी गोहत्येविषयी अतिशय करडी भूमिका घेतल्याने कॉंग्रेसचे दात त्यांच्याच घशात गेले आहेत. या मुद्यावर आता कॉंग्रेस पक्ष व त्यांचे कथित सेक्युलर नेते कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.