किमान तापमान : 23.35° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.35° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=व्यापमं घोटाळा, सुप्रीम कोर्टाची राज्यपालांना, केंद्राला नोटीस=
नवी दिल्ली, [२० नोव्हेंबर] – प्रचंड गाजलेल्या मध्यप्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं) भरतीत झालेल्या कथित घोटाळ्यात सहभागी असलेले राज्यपाल राम नरेश यादव यांना पदावरून हटविण्याची विनंती करणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी केंद्र सरकार आणि स्वत: राज्यपालांना नोटीस जारी केली आहे.
पदावर असताना राज्यपालांचा एखाद्या घोटाळ्यात सहभाग असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना पदावरून तातडीने हटविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे तयार करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने द्यावे, अशी विनंतीही याचिकेतून केली आहे.
सरन्यायाधीश एच. एल. दत्तू, न्या. शिवा किर्ती सिंह आणि न्या. अमितवा रॉय यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी याचिकाकर्त्याच्या वतीने केलेला युक्तिवाद मान्य करताना, केंद्र व राज्यपालांना नोटीस बजावली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे, राम नरेश यादव यांना या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पदावरून हटविण्यात यावी, अशी याचिका यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.