किमान तापमान : 27.78° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.73°से. - 30.4°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=आठही आमदारांचा डीएएनमध्ये प्रवेश: राम माधव यांची माहिती=
कोहिमा, [२१ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेत नेस्तनाबूत झालेला कॉंगे्रस पक्ष दिल्लीनंतर आता नागालॅण्डमधूनही पूर्णपणे हद्दपार झाला आहे. नागालॅण्डमधील या पक्षाच्या आठही आमदारांनी शुक्रवारी सायंकाळी नागा पीपल्स फ्रंट आणि भाजपाचा समावेश असलेल्या डेमॉक्रॅटिक अलायन्स फ्रंटमध्ये (डीएएन) प्रवेश केला आहे. यामुळे हे राज्यही कॉंगे्रसमुक्त झाले आहे.
गुवाहाटी उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालानुसारच या आमदारांनी पक्षांतर केले असल्याने, त्यांना अपात्र ठरविण्यात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे नागा पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष शुरोझेलिया लिझित्सू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या घडामोडीबाबतची सविस्तर माहिती देताना भाजपाचे प्रवक्ते राम माधव म्हणाले की, कॉंगे्रसच्या सर्व आठही आमदारांनी भाजपाचा समावेश असलेल्या आघाडीत प्रवेश केला आहे. आज नागालॅण्ड पूर्णपणे कॉंगे्रसमुक्त झाले आहे. कॉंगे्रस पक्षाला मोठा धक्का देणारी ही घडामोड आहे.
नागालॅण्डमध्ये शुक्रवारी दिवसभर राजकीय घडामोडी अतिशय वेगाने घडत होत्या. आपल्या आमदारांना रोखण्यासाठी दिल्लीतील कॉंगे्रसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या आमदारांनी नागालॅण्ड विधानसभेच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर अपात्र ठरविण्यापासून रक्षण करणार्या कायद्यांतर्गत प्रारूपानुसार पक्षांतराची प्रक्रिया पूर्ण केली.
गेल्या ५ फेबु्रवारी रोजी मुख्यमंत्री टी. आर. झेलियांग यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर झाला असता, कॉंगे्रसच्या याच आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला होता, हे विशेष!