किमान तापमान : 27.12° से.
कमाल तापमान : 30.37° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 38 %
वायू वेग : 4.99 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.37° से.
23.84°से. - 31.99°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.33°से. - 27.74°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.61°से. - 28.54°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.49°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर कुछ बादल25.02°से. - 28.97°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.45°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल=प्रशांत भूषण यांचा हल्ला=
नवी दिल्ली, [४ एप्रिल] – आम आदमी पार्टीच्या सर्वच महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आलेले प्रशांत भूषण यांनी पुन्हा एकदा आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रखर शाब्दिक वार केले. पक्षाला ज्या स्थितीत तुम्ही आणले आहे आणि आपण सध्या जे काही करीत आहात, त्यासाठी कदाचित देवही तुम्हाला माफ करणार नाही, असे भूषण यांनी केजरीवालांना पत्र लिहून म्हटले आहे.
‘तुम्हाला पक्षाची संपूर्ण सूत्रे आपल्या हातात हवी आहेत. तुम्हाला एकप्रकारे हुकूमशाहीच गाजवायची आहे, असे तुमच्या एकूण व्यवहारावरून दिसून येते. असे करून तुम्ही पक्षाच्या लाखो शुभचिंतकांच्या विश्वासाला तडा देत आहात. दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश दिले आहे. नशीब आपल्या पाठीशी असताना दिल्लीकरांची मनोभावे सेवा करण्याऐवजी आपण मार्गावरून भरकटले आहात. आपल्याकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा होती. पण, दुर्दैवाने तुम्ही चुकीच्या मार्गावर गेले आहात. यासाठी देवच काय, तर इतिहासही तुम्हाला माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा,’ असे प्रशांत भूषण यांनी केजरीवालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, केजरीवालांना लिहिलेल्या या पत्राच्या शेवटी भूषण यांनी गुडबाय, गुडलक असे लिहिले आहे. हाच धागा पकडून पत्रकारांनी त्यांना, आपण पक्षाचा राजीनामा दिला काय, असे विचारले असता, ते म्हणाले की, पत्राचा शेवट मी तसा केला असला, तरी पक्ष सोडण्याचा माझा कोणताही हेतू नाही. माझ्यावर पक्षाने जे काही आरोप ठेवले आहेत, ते सर्व निराधार आहेत. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आपली बाजू मांडण्याची माझी इच्छा होती. पण, पक्षाने मला संधीच दिली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.