किमान तापमान : 26.76° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 4.09 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.84°से. - 28.46°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 27.9°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.54°से. - 28.43°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.56°से. - 28.81°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.03°से. - 29.2°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.17°से. - 29.17°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल=सुनील लाल यांची मागणी=
नवी दिल्ली, [८ एप्रिल] – आम आदमी पार्टीतील अंतर्गत कलह आता चांगलाच शिगेला पोहोचला आहे. एका व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांना आपली वॅगन आर कार परत मागितली असतानाच, पक्षाचे बोधचिन्ह (लोगो) तयार करणारे सुनील लाल यांनी चक्क आपने आपले संकेतस्थळ, पत्रके, झेंडे आणि पोस्टर्सवर आपण तयार केलेले बोधचिन्ह वापरू नये, असे स्पष्ट करून त्यावर आपला मालकी हक्कच सांगितला आहे.
आपने माझे बोधचिन्ह परत करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या पक्षातील कलहामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. याआधीच्या ४९ दिवसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात अरविंद केजरीवाल यांच्याजवळ जी निळ्या रंगाची वॅगन-आर कार दिसत होती, तीदेखील त्यांना ब्रिटनमधील कुंदन शर्मा यांनी दिली होती. पक्षातील कलहावर नाराजी व्यक्त करीत त्यांनी आपली ही कारही केजरीवालांना परत मागितली आहे. त्यानंतर आता बोधचिन्ह तयार करणारे पक्षाचे कार्यकर्ते सुनील लाल यांनीही पक्षातील वादावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मी तयार केलेले बोधचिन्ह ही माझी बौद्धिक संपदा आहे. त्याचा मालकीहक्क मी पक्षाकडे हस्तांतरित केलेला नाही. त्यामुळे पक्षाने तातडीने या बोधचिन्हाचा उपयोग थांबवावा, असे सांगताना त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठविले आहे. इतकेच नव्हे, तर आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, तो तत्काळ स्वीकारण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे. आपने लोकांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पक्ष अपयशी ठरला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.