किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.98° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.09 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.76°से. - 27.41°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल25.27°से. - 27.79°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.16°से. - 28.5°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.08°से. - 28.9°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.58°से. - 28.05°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.41°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादलहैदराबाद, [१२ एप्रिल] – येत्या काही महिन्यात बिहारमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला रोखणे हेच आमचे मुख्य लक्ष्य आहे, असे माजी केंद्रीय मंत्री व वरिष्ठ कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले असून, एकप्रकारे प्रस्तावित जनता परिवारासोबत आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोणताही प्रभाव राहणार नाही, असा दावा रमेश यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. जनता परिवाराची विखुरलेली ताकद एकत्र येत आहे, ही आनंदाची बाब आहे आणि आम्ही त्याचे स्वागत करतो. जनता परिवार ज्या संकटाचा सामना करीत आहे तसाच कॉंग्रेसही करीत आहे. बिहारची विधानसभा निवडणूक ही आम्हा सर्वांसाठी एक परीक्षा आहे. याचवर्षी दिल्लीत पार पडलेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव ओसरला. आता बिहारात भाजपाला रोखण्यात यश आले तर मोदी पूर्णपणे प्रभावहीन होतील, असे जयराम रमेश म्हणाले.
या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधी ताकद एकजूट होत आहे, हा स्वागतार्ह घटनाक्रम असल्याचेही रमेश म्हणाले. कॉंग्रेस जयदुसोबत धोरणात्मक भागीदारी करणार का, असे विचारले असता, आम्ही नितीशकुमार यांच्या सरकारला पाठिंबा दिला आहे, अशी आठवण रमेश यांनी करून दिली. २०१९ ची निवडणूक जिंकणे हे कॉंग्रेसचे दीर्घकालीन धोरण असले तरी तत्कालीक लक्ष्य बिहारमध्ये भाजपाला रोखणे हेच आहे. यासाठी आम्हाला जे काही करावे लागेल ते आम्ही करू, असे स्पष्ट करतानाच याचा प्रभाव राष्ट्रीय राजकारणावरही पडेल, असा दावाही त्यांनी केला.