किमान तापमान : 22.67° से.
कमाल तापमान : 22.88° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.88° से.
22.79°से. - 25.53°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
मंगळवार, 14 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश24.11°से. - 25.55°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
शुक्रवार, 17 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शनिवार, 18 जानेवारी टूटे हुए बादल=मद्रास हायकोर्टाचा निर्वाळा=
चेन्नई, [६ मार्च] – केवळ अनुदानित आणि शासकीय शाळांमध्येच नव्हे, तर विनाअनुदानित आणि खाजगी शाळांमध्येही सकाळची प्रार्थना राष्ट्रगीतानेच सुरू करणे अनिवार्य आहे, असा महत्त्वाचा आणि दूरगामी परिणामकारक निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच दिला.
शासकीय शाळांची सुरुवात राष्ट्रगीतानेच होत असते. पण, खाजगी शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत म्हटले जाते की नाही, याची तपासणी करण्यात यावी. संबंधित राज्यांमधील शिक्षण विभाग आणि केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाने ही जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
भारतीय लष्करातील निवृत्त अधिकारी एन. सेल्वातिरुमल यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले. काही खाजगी शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत गायले जात नाही, याकडे लक्ष वेधत त्यांनी शासकीय शाळांसोबतच देशातील सर्व खाजगी शाळांमध्येही राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करण्यात यावे, अशी विनंती केली आहे. त्यावर मुख्य न्यायाधीश संजय किशन कौल आणि न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. विशेष म्हणजे, यापूर्वी कोलकाता उच्च न्यायालयासह काही राज्यांतील न्यायालयांनी सर्वच शाळांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाचा मान राखणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. केंद्रीय शालांत परीक्षा मंडळ आणि अन्य शैक्षणिक संस्थांनीही त्यासाठी परिपत्रक जारी केले असून, ते सर्व शाळांना बंधनकारक असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.