किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.65° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.52°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.69°से. - 28.91°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.85°से. - 28.87°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.96°से. - 28.66°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.35°से. - 28.38°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.91°से. - 28.26°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल=मोन्सेराट पॅनेलला स्पष्ट बहुमत=
पणजी, [८ मार्च] – गोव्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला पणजी या राजधानीच्या शहरातील महानगर पालिकेची सत्ता गमवावी लागली आहे. पणजी महानगर पालिकेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कॉंगे्रसचे बंडखोर नेते ऍटान्सिओ मोन्सेराट यांच्या पॅनेलने ३० पैकी १७ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळविले. भाजपाला केवळ १३ जागा मिळाल्या असून, कॉंगे्रसला भोपळाही फोडता आला नाही.
वर्षभरातच गोवा विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे पणजी महापालिकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व दिले जात होते. आतापर्यंत या महापालिकेवर भाजपाचीच सत्ता होती. पण, नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी भाजपाची कुठलीही पिछेहाट झाली नसल्याचे स्पष्ट केले. या निवडणुकीच्या निकालाचा विधानसभा निवडणुकीवर कुठलाही परिणाम होणार नाही. ही स्थानिक निवडणूक आहे, असे सांगताना गोव्यात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक घेण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.
या महापालिकेसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. एकूण ७५ टक्के मतदान झाले होते. मडगाव पाठोपाठ पणजी महापालिकेतही भाजपाचा पराभव झाल्याने भाजपा सरकारसाठी हा एक इशाराच असल्याचे मानले जात आहे.