किमान तापमान : 22.88° से.
कमाल तापमान : 24.65° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 66 %
वायू वेग : 3.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.88° से.
21.99°से. - 28.52°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.69°से. - 28.91°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.85°से. - 28.87°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.96°से. - 28.66°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.35°से. - 28.38°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल22.91°से. - 28.26°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलबेळगाव, [९ मार्च] – संकेश्वर येथे शेतातील विहिरीतून गाळ काढत असताना विहिरीत तब्बल ४० बॉम्ब सापडले आहे. माजी मंत्री मल्हारीगौडा पाटील यांच्या राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या शेतातील विहिरीत हे बॉम्ब सापडल्यामुळे आश्चर्य आणि भीती व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री मल्हारीगौडा पाटील यांच्या शेतातील विहिरीतून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. काल सायंकाळी कामगारांना गाळ काढताना काही बॉम्ब आढळले. त्यांनी ही बातमी लगेच पाटील यांना दिली. पाटील यांनी तातडीने पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी हे बॉम्ब ताब्यात घेतले आहेत.
हे बॉम्ब बराच काळ पाण्यात राहिल्यामुळे गंजून गेले आहे. या बॉम्बची पाहणी मराठा लाई इन्फंट्रीचे अधिकारी करणार आहेत. त्यानंतरच हे बॉम्ब कोणते आणि कुठून आले याबाबत तपास सुरू करणार आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार कोम्बिंग ऑपरेशन करताना अशा प्रकारच्या बॉम्बचा वापर करण्यात येतो असे सांगण्यात आले आहे.