किमान तापमान : 24.69° से.
कमाल तापमान : 24.89° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.89° से.
24.41°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलनवी दिल्ली, [१४ मार्च] – एप्रिलमध्ये होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपा हिंदू मतांच्या आधारावर सत्तारूढ युडीएफ डाव्या पक्षांच्या अनेक जागा बळकावणार असली, तरी अल्पसंख्यकांचा पाहिजे तेवढा पाठिंबा न मिळाल्याने त्याचा फायदा कॉंग्रेसला मिळू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना यंदाची निवडणूक कठीण असून, त्याचा फायदा काही प्रमाणात भाजपाला मिळू शकतो, असे निवडणुकीबाबत केरळचा इतिहास पाहिला असता दिसून येते, असेही या निरीक्षकांचे मत आहे.
यंदा केरळमध्ये त्रिकोणी संघर्ष पाहायला मिळणार असल्याने व अत्यंत चुरस राहणार असल्याने डावे पक्ष जिथे आपला पाया मजबूत आहे, तिथे आक्रमक निवडणूक प्रचार करेल, असेही काहींचे म्हणणे आहे.
या अगोदर राज्यात ज्या प्रमुख घटकांवर डाव्यांचा प्रभाव होता, त्यापैकी काहींना भाजपाने आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले असून कॉंग्रेससोबत असलेल्या नायर गटातील काही सदस्यांनाही त्या पक्षाने प्रभावित केल्याचे सांगण्यात आले.
असे असले, तरी ख्रिश्चन व मुस्लिम हे दोन अल्पसंख्य घटक आजही कॉंग्रेससोबत असल्याने त्रिकोणी संघर्षात कॉंग्रेसला त्याचा फायदा मिळू शकतो, असे काही राजकीय निरीक्षकांना वाटत आहे.