किमान तापमान : 25.19° से.
कमाल तापमान : 25.72° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 2.21 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.72° से.
24.15°से. - 28.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.8°से. - 28.3°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.7°से. - 28.55°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.02°से. - 28.98°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.35°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.29°से. - 29.02°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल=भाजपाची बंदची हाक=
बंगळुरू, [१४ मार्च] – विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता राजू याची रविवारी म्हैसूर येथे हत्या करण्यात आली. राजू आपल्या मित्रांबरोबर चहा पित असताना एका व्यक्तीने धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. त्याला तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
राजूच्या मृत्यूचे वृत्त समजताच नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला. भाजपाने म्हैसूर बंदचे आवाहन केले होते. बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संतप्त निदर्शकांनी एक ऑटो पेटवून दिला तसेच तीन बसगाड्यांचेही नुकसान केले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या हत्येचा तपास केंद्रीय गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्याची घोषणा म्हैसूरचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी केली. दरम्यान, याप्रकरणी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मृतकाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईची रक्कम ठरविण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सी. सिक्का यांनी दिली.
‘राजूने उदयगिरी परिसरात गणपती मंदिराची स्थापना केली होती. त्यामुळेच तो अनेकांच्या निशाण्यावर होता व यामुळेच त्याची हत्या करण्यात आली, असा अरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद जोशी यांनी केला असून, तसे निवेदनही पक्षातर्फे जारी करण्यात आले.