किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.98° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.5°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.93°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, [८ ऑगस्ट] – शेअर बाजारात सध्या असलेल्या तेजीचा परिणाम विविध कंपन्यांकडून केल्या जाणार्या कॅम्पस सिलेक्शनवरही झाला असून, आयआयटी संस्थांमधील विद्यार्थ्यांना आकर्षक वेतनाच्या पॅकेजेसची ऑफर दिली जात असल्याचे एका अर्थविषयक वृत्तपत्राच्या वृत्तात म्हटले आहे.
आधुनिक युगाची देण म्हणून ओळखल्या जाणार्या सोशल मीडिया क्षेत्रात आघाडीवर असलेल्या गूगलने या मोसमात गैरआयआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयांवर आपले लक्ष केंद्रित केले आणि बिट्स पिलानी येथील विद्यार्थ्यांना वार्षिक १.४४ कोटी रुपयांच्या पॅकेजचा प्रस्ताव सादर केला. हा प्रस्ताव गूगलच्या परदेशी कार्यालयांसाठी आहे. गूगलप्रमाणेच मायक्रोसॉफ्टनेही आपल्या रेडमंड येथील मुख्यालयासाठी ७९.५१ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजचा प्रस्ताव सादर केला आहे.
गेल्यावर्षी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांनी अनुक्रमे ६८.३४ आणि ६० लाखांच्या वार्षिक पॅकेजचे प्रस्ताव सादर केले होते. परंतु, यावेळी वातावरण अगदीच वेगळे आहे आणि कंपन्या मोठ्या उत्साहाने कॅम्पस सिलेक्शन करीत आहेत. अनेक कंपन्यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी २५ टक्के अधिक वेतनाची ऑफर दिली असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे. नोकरी मिळणार्यांच्या संख्येत यंदा ४० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे, बिट्स पिलानीचे मुख्य प्लेसमेंट अधिकारी जी. बालसुब्रमण्यम् यांनी सांगितले. बिट्सच्या गोवा कॅम्पसमध्ये १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. या महाविद्यालयाचे चार कॅम्पस आहेत. याशिवाय अनेक नामांकित कंपन्या आकर्षक वेतनाचे प्रस्ताव घेऊन येत असल्यामुळे यावर्षी कॅम्पस सिलेक्शनमध्ये विद्यार्थ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.