किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=२८ वर्षांच्या प्रीतीला मिळाला चालकाचा मान=
चेन्नई, [२९ जून] – तामिळनाडूची राजधानी चेन्नई येते आज सोमवारपासून मेट्रोसेवा सुरू झाली. मुख्यमंत्री जयललिता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सेवेचे उद्घाटन केले. यासोबतच मेट्रोसेवा असलेले चेन्नई देशातील सहावे शहर बनले आहे.
विशेष म्हणजे २८ वर्षीय अभियंता प्रीतीला शहरातील पहिली मेट्रो चालविण्याचा बहुमान मिळाला. चेन्नई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा मार्ग दहा किलोमीटरचा असून, या मार्गावर एकूण ७ स्थानके आहेत. हे अंतर पार करण्यासाठी मेट्रोला १८ मिनिटे लागणार आहेत. मेट्रोतून प्रवासाचे दर सामान्यांना परवडणारे असून ते १० पासून ४० रुपयांपर्यंत आहेत. एका मेट्रोत एकूण चार डबे असून, त्यात एकावेळी १२७६ प्रवासी प्रवास करू शकतील. यानंतर, दुसर्या टप्प्याच्या मेट्रोमार्गाची निर्मिती सुरू होणार असून, तो मार्ग २२ किमीचा असेल. हे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असून, त्यात चेन्नईचे रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि विमानतळही जोडण्यात येणार आहे. आपली मुलगी मेट्रोची चालक झाल्याबद्दल प्रीतीचे पिता आर. अनबू यांनी मुलीच्या यशाविषयी आनंद व्यक्त करीत आपले स्वप्न पूर्ण झाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
देशभरातील सहा शहरांमध्ये एकूण २८० किलोमीटर मार्गावर मेट्रोचे जाळे तयार झाले असून, दिवसाकाठी २० लाख लोक त्यातून प्रवास करीत आहेत. राजधानी दिल्लीसह, कोची, लखनौ, हैदराबाद, अहमदाबाद, इंदूर, भोपाळ आणि पुण्यासह नागपुरातही मेट्रो प्रकल्पावर काम सुरू आहे. एकट्या दिल्लीत मेट्रोमुळे चार लाख वाहने रस्त्यावर न आल्याने दहा हजार कोटींचे डिझेल, पेट्रोल आणि सीएनजी वाचले आहे.