किमान तापमान : 25.99° से.
कमाल तापमान : 26.94° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
25.99°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.54°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलमुंबई, [२९ जून] – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे एक शिष्टमंडळ आठवडाभराच्या अमेरिका दौर्यासाठी सोमवारी सकाळी येथून रवाना झाले. या दौर्यात हे शिष्टमंडळ तेथील विविध प्रमुख उद्योग समुहांशी चर्चा करणार आहे.
मुख्यमंत्र्यांसह या शिष्टमंडळात उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, उद्योग विभागाचे विकास आयुक्त सुरेंद्रकुमार बागडे यांचाही समावेश आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हेदेखील या दौर्यात सहभागी होणार आहेत. आपल्या या अमेरिका दौर्यात मुख्यमंत्री फडणवीस मायक्रोसॉफ्ट, जनरल मोटर्स, बोईंग, क्रिसलर, आयएसई, ऍप्पल, गुगल, सॅनडिक्स, ऍमेझॉन, ब्लॅकस्टोन, बँक ऑफ अमेरिका, सिस्को, इत्यादी बड्या कंपन्यांच्या प्रमुखांशी भेटून त्यांना राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन करणार आहेत. तसेच कोकाकोला या उद्योग समूहासोबतच्या राज्याच्या सामंजस्य करारावरही या दौर्यात स्वाक्षरी होणार आहे. यासोबतच बोईंग, जनरल मोटर्स आदी उद्योग समूहांच्या प्रकल्पांनाही शिष्टमंडळ भेटी देणार आहे.
दौर्याचा प्रारंभ न्यू जर्सीच्या गव्हर्नरांसोबत भेटीने होणार आहे. न्यूयॉर्क, डेट्रॉईट आणि सॅनफ्रान्सिस्को इथे होणार्या व्यापार आणि गुंतवणूक विषयक परिषदेत फडणवीस मार्गदर्शन करतील. लॉस एंजेलिस येथे अमेरिका आणि कॅनडातील बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित १७ व्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थानही फडणवीस भूषवणार आहेत. या अधिवेशनात अमेरिका व कॅनडातील चार हजारांहून अधिक मराठीबांधव सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.