किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.17° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.9°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल=व्यस्त कार्यक्रमामुळे सध्या वेळ देणे शक्य नाही, पीएमओने पाठविले पत्र=
नवी दिल्ली, [३० जून] – दिल्लीवरील अधिकाराबाबत नायब राज्यपालांसोबतचा वाद केजरीवाल सरकारसाठी डोकेदुखीचा विषय ठरला असतानाच, यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. तथापि, व्यस्त कार्यक्रमांमुळे पंतप्रधान कार्यालयाने त्यांना तूर्तास भेट नाकारली आहे.
पंतप्रधान मोदी सध्या अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. खूपच महत्त्वाचे आणि तातडीचे काम असेल, तर गृहमंत्री राजनाथसिंह किंवा अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घ्या, असा संदेश पंतप्रधान कार्यालयाकडून केजरीवाल यांना पाठविण्यात आला आहे. दिल्लीशी संबंधित काही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी केजरीवाल यांनी पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती. या भेटीसाठी गेल्या १० दिवसांपासून केजरीवाल यांचे कार्यालय पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहे. पण, पंतप्रधान कार्यालयाकडून केजरीवाल यांना तूर्त भेटीसाठी वेळ देण्यास नकार कळविण्यात आला आहे. व्यस्त कार्यक्रमांमुळे पंतप्रधान आपणास भेटू शकणार नाहीत. त्यामुळे आपण गृहमंत्री किंवा अर्थमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी, अशा प्रकारचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने केजरीवालांना पाठविले आहे.
दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात अनेक मुद्यांवरून संघर्ष शिगेला गेला आहे. दिल्लीला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची मागणी केजरीवाल यांनी सातत्याने लावून धरली आहे. पण, दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने ही मागणी मान्य करता येणार नाही, अशी केंद्राची भूमिका आहे. त्यातच आता पंतप्रधानांनी केजरीवाल यांना भेट नाकारल्याने दिल्लीचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.