किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल=एसआयटी चौकशीला स्थगिती नाही=
नवी दिल्ली, [२ फेब्रुवारी] – महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना, आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून बेकायदेशीरपणे ठेके दिल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) होणार्या चौकशीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी स्पष्ट नकार दिला. हा निकाल भुजबळांना ‘सुप्रीम’ झटकाच मानला जात असून, यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
बेकायदेशीर ठेका प्रकरणात छगन भुजबळ यांच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती गठित (एसआयटी) करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात भुजबळांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सरन्यायाधीश एच. एल. दत्तू आणि न्या. ए. के. सिक्री यांचा समावेश असलेल्या न्यायासनाने उच्च न्यायालयाचा निर्णय वैध ठरविला आणि भुजबळांची याचिका फेटाळून लावली.
भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून बेकायदेशीरपणे ठेके मंजूर केले होते, असा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी केला होता. त्यांनीच दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने भुजबळ यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने भुजबळ यांची याचिका फेटाळून लावली असल्याने त्यांच्यासोबतच त्यांचे पुत्र पंकज आणि पुतण्या समीर भुजबळ यांचीही एसआयटीकडून चौकशी होणार आहे. या चौकशी समितीत अंमलबजावणी संचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकार्यांचा समावेश राहणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या समितीला आपला चौकशी अहवाल येत्या २८ फेबु्रवारीपर्यंत सादर करायचा आहे.