किमान तापमान : 30.86° से.
कमाल तापमान : 33.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 31 %
वायू वेग : 2.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
33.99° से.
27.71°से. - 33.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.26°से. - 30.15°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.44°से. - 29.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.92°से. - 29.75°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.79°से. - 29.45°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.54°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, [२ फेब्रुवारी] – राजधानी दिल्लीचा विकास फक्त भाजपाच करू शकते, त्यामुळे दिल्लीत भाजपाला विजयी करा, असे आवाहन करताना स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त दिल्लीसाठी भाजपा कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिली.
दिल्ली प्रदेश भाजपा कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत गडकरी म्हणाले की, केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाचे सरकार आल्यानंतर दिल्लीच्या विकासाचे अनेक निर्णय घेण्यात आले. दिल्लीशी संबंधित अनेक समस्या सोडविण्यात आल्या. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे दिल्लीतही किरण बेदी यांच्या नेतृत्वात भाजपाला विजयी करा, म्हणजे केंद्र आणि दिल्लीतील भाजपा सरकारच्या रूपाने दिल्लीच्या विकासासाठी डबल इंजिन कार्यरत होईल, आणि दिल्लीच्या विकासाला गती येईल, असे गडकरी म्हणाले.
आम आदमी पार्टी ही कन्फ्युज्ड नेत्यांची डिफ्युज्ड पार्टी आहे, जनतेची दिशाभूल करण्याचे काम या पार्टीतर्फे सुरू आहे, असा आरोप गडकरी यांनी केला. दिल्लीच्या विकासासाठी आपल्या मंत्रालयातर्फे आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेताना गडकरी म्हणाले की, दिल्लीत वाहतुकीच्या कोंडीची मोठी समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी रस्ते वाहतूक संशोधन संस्थेला प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. दिल्लीत रिंगरोडचे काम एप्रिलपासून सुरू केले जाईल, आणि तीन वर्षात हे काम पूर्ण केले जाईल, ५ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, रिंगरोड तयार झाल्यानंतर दिल्लीतील वाहतुकीच्या कोंडीची समस्या दूर होईल.
दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-मेरठ महामार्गाचे कामही सुरू करण्यात आले आहे, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले म्हणाले की, दिल्ली जयपूर महामार्गावर ७५ उड्डाणपूल राहणार असून यातील ५५ उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल आणि जूनपासून हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होईल. त्याचप्रमाणे दिल्ली-मेरठ मार्गावर दिल्ली- डासनापर्यंत ५७ किमीचा मार्ग हा १६ पदरी राहणार असून डासना ते हापार्डपर्यंतचामार्ग सहा पदरी राहणार आहे. दिल्ली- अमृतसर मार्गाचेही काम सुरू झाले आहे. यमुना नदी प्रदूषणापासून मुक्त करण्याची तसेच या नदीतून दोन वर्षात जलवाहतूक सुरू करण्याची सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.