किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादल=११ जण जखमी=
नवी दिल्ली, [२ फेब्रुवारी] – येथील भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या कृष्णानगरस्थित कार्यालयावर सोमवार, २ रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हल्लेखोर बेदी यांच्या विरोधात घोषणा देत होते. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या मारहाणीत ११ जण जखमी झाले आहेत.
विशेष म्हणजे किरण बेदी या कृष्णानगर मतदारसंघातूनच निवडणूक लढवित आहेत आणि तिथेच त्यांचे कार्यालयही आहे. स्वत: किरण बेदी यांनी ट्विट करून या हल्ल्याची माहिती दिली आहे. प्रचारकार्यात व्यस्त असलेल्या बेदी यांनी घटनेची माहिती मिळताच कार्यालयाकडे धाव घेतली.
दिल्लीतील निवडणूक आता अगदी जवळ आली असून प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. मात्र, अशा प्रकारची हिंसक घटना हा चिंतेचा विषय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.