|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:35 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 31.26° से.

कमाल तापमान : 33.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 31 %

वायू वेग : 1.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

33.99° से.

हवामानाचा अंदाज

27.28°से. - 33.99°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

26.7°से. - 30.57°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.81°से. - 29.87°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.37°से. - 30.16°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.19°से. - 29.85°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.22°से. - 29.93°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवालांची उमेदवारी रद्द का करू नये

केजरीवालांची उमेदवारी रद्द का करू नये

=हायकोर्टाची नोटीस=
delhi high-courtनवी दिल्ली, [२ फेब्रुवारी] – स्वत:ला नवी दिल्लीचे रहिवासी असल्याचे बेकायदेशीरपणे जाहीर केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी विनंती करणार्‍या कॉंगे्रसच्या किरण वालिया यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आज सोमवारी केजरीवाल यांना नोटीस जारी केली आहे.
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेले केजरीवाल यांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी आपण दिल्लीचे नागरिक असल्याचे नमूद केले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन न्या. विभू बाखरू यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने, ‘तुमची उमेदवारी रद्द का केली जाऊ नये,’ अशी विचारणा केजरीवालांना केली आहे. सोबतच, निवडणूक आयोग आणि दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनाही नोटीस जारी करून न्यायालयाने येत्या बुधवारपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.
या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या बुधवारी होणार असल्याने त्यापूर्वी नोटीसला उत्तर देणे अनिवार्य आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. केजरीवाल हे उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील कौशांबी भागात असलेल्या गिरनार अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक चारमध्ये वास्तव्यास असतानाही, त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातील रहिवासी असल्याचे दाखविले. हा प्रकार फौजदारी गुन्ह्यात येत असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करायलाच हवी, असे वालिया यांनी याचिकेत म्हटले आहे.

Posted by : | on : 3 Feb 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g