किमान तापमान : 26.05° से.
कमाल तापमान : 26.17° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.05° से.
25.99°से. - 28.66°से.
बुधवार, 19 फेब्रुवारी25.62°से. - 28.89°से.
गुरुवार, 20 फेब्रुवारी26.23°से. - 30.31°से.
शुक्रवार, 21 फेब्रुवारी26.47°से. - 29.59°से.
शनिवार, 22 फेब्रुवारी26.55°से. - 29.52°से.
रविवार, 23 फेब्रुवारी26.48°से. - 29.5°से.
सोमवार, 24 फेब्रुवारी=क्रीडा मंत्री विनोद तावडे यांची माहिती=
मुंबई, [३ फेब्रुवारी] – महाराष्ट्राला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे. भविष्यात महाराष्ट्रात अधिकाधिक हिंदकेसरी निर्माण व्हावेत यासाठी राज्यात दहा ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी येथे दिली.
महाराष्ट्राचा हिंद केसरी सुनील साळुंखे यानी मंगळवारी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांची मंत्रालयात भेट घेतली. विनोद तावडे यांनी साळुंखे याचे अभिनंदन केले. भविष्यात कुस्तीचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी काय करता येईल, याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली.
यावेळी तावडे म्हणाले की, कुस्ती खेळाला नावरूप देणे, तसेच महाराष्ट्रात अधिकाधिक हिंदकेसरी निर्माण व्हावेत यासाठी क्रीडामंत्री म्हणून आपण जातीने लक्ष देऊ. तर, यासाठी दहा ठिकाणी कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. २०२० मध्ये होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला अधिकाधिक पदके कशी जिंकता येतील याबाबतचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.