किमान तापमान : 23.14° से.
कमाल तापमान : 23.45° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 47 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.14° से.
22.99°से. - 26.45°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
रविवार, 26 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
सोमवार, 27 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
गुरुवार, 30 जानेवारी टूटे हुए बादल=भाजपाचे व्हिजन डाक्युमेंट प्रकाशित=
नवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] – राजधानी दिल्ली वर्ल्ड क्लास करण्याची आणि दिल्लीच्या जनतेला सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याची ग्वाही भाजपाच्या व्हिजन डाक्युमेंटमधून देण्यात आली आहे.
संपूर्ण राजधानीचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या भाजपाच्या व्हिजन डाक्युमेंटचे आज दिल्ली प्रदेश भाजपा कार्यालयात प्रकाशन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय खत आणि रसायन मंत्री अनंतकुमार, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन, भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी, दिल्ली प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सतीश उपाध्याय आणि दिल्ली प्रदेश भाजपाचे प्रभारी खा. प्रभात झा उपस्थित होते.
भाजपा राजधानीतील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासोबतच कायदा सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा, वीज, पाणी, अनधिकृत झोपड्यांचा प्रश्न, पर्यावरण, यमुना नदीचे सौंदर्यीकरण आणि गृहनिर्माणाकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याची ग्वाही किरण बेदी यांनी यावेळी बोलताना दिली.
राजधानीला वर्ल्ड क्लास बनवायचे असेल तर पायाभूत सुविधांचा दर्जाही सुधारावा लागले, असे स्पष्ट करत बेदी म्हणाल्या की, यासाठी मेट्रो, मेट्रो फीडर बससेवा आणि दिल्ली बस सेवा यांची सांगड घालावी लागेल. या सर्वातून प्रवास करण्यासाठी वेगवेगळी तिकीटे न घेता एकच स्मार्ट कार्ड चालेल, अशी व्यवस्था केली जाईल. मेट्रोचा विस्तार राष्ट्रीय राजधानी क्षेत्रापर्यंत करावा लागेल. महिलांच्या सुरक्षेला आपल्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता राहणार आहे, असे स्पष्ट करत बेदी म्हणाल्या की, यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष गठित केला जाईल. जो २४ तास सुरू राहील. मुख्यमंत्री कार्यालयाच्या देखरेखीखाली विशेष महिला सुरक्षा दलही गठित केले जाईल, जे पोलिस खात्याशी समन्वय साधून काम करेल. महिलांना स्वयंसुरक्षेसाठी मार्शल आर्टचे धडे शाळा आणि महाविद्यालयातून दिले जातील. प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलिस ठाणे स्थापन केले जाईल. महिलांवरील अत्याचाराच्या खटल्यांची जलदगतीने सुनावणी व्हावी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली जाईल, असे बेदी यांनी सांगितले.
आपल्या सरकारने काय काम केले, जनतेच्या कल्याणासाठी आणि राजधानीच्या विकासासाठी कोणत्या योजना आणल्या याची माहिती दर महिन्यात रेडिओवरुन होणार्या ‘दिल की बात’ कार्यक्रमातून दिली जाईल, असे बेदी यांनी सांगितले.
दूरदर्शिता आणि संवेदनशीलता हा मोदी सरकारच्या कामाचा आधार असल्याचे केंद्रीय खत आणि रसायन मंत्री अनंतकुमार यांनी सांगितले. दिल्लीचा विकास करायचा असेल तर केंद्र सरकारशी सहकार्य करणार्या सरकारची गरज आहे, संघर्ष करणार्या सरकारची नाही, देशाच्या विकासासोबत आम्हाला दिल्लीचा विकास करायचा आहे. सुशासनासोबत विकास ही आमची भूमिका आहे, असे अनंतकुमार यांनी स्पष्ट केले. भाजपाचे व्हिजन डाक्युमेंट म्हणजे दिल्लीच्या विकासाचा रोडमॅप आहे, असे खा. प्रभात झा यांनी स्पष्ट केले. व्हिजन डाक्युमेंटमागची भूमिका सतीश उपाध्याय यांनी मांडली. डॉ. हर्षवर्धन यांनी आभार मानले.