किमान तापमान : 29.42° से.
कमाल तापमान : 31.8° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.41 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.8° से.
27.28°से. - 32.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश=मंत्रिमंडळाचा निर्णय=
मुंबई, [३ फेब्रुवारी] – राज्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना विशेष मदत व सवलती देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयानुसार, मृत्युमुखी पडलेली व्यक्ती कुटुंबातील कर्ता असल्यास त्याच्या वारसांना एकूण अडीच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. यातील दीड लाख रुपये शासन आणि एक लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात येतील. तर इतर व्यक्तींच्या वारसास दीड लाख रुपयांची मदत दिली जाईल.
याशिवाय मृत जनावरांच्या मालकांना मोठ्या जनावरांच्या नुकसानीबाबत एका जनावरासाठी २५ हजार रुपये, दोन मध्यम जनावरांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये, दोन लहान जनावरांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये, चार लहान जनावरांसाठी प्रत्येकी साडेतीन हजार रुपये या प्रमाणात मदत देण्यात येणार आहे.
पडझड झालेल्या घरांच्या मदतीअंतर्गत पूर्णत: उद्ध्वस्त झालेल्या पक्क्या घरांसाठी ७० हजार रुपये, पूर्णत: उद्ध्वस्त झालेल्या कच्च्या घरासाठी २५ हजार रुपये, अंशत: किमान १५ टक्के नुकसान उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी १५ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. पिकांच्या नुकसानीसाठी कोरडवाहू शेतीपिकांसाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर, आश्वासित सिंचन क्षेत्राखाली पिकांसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टरी, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टरी मदत देण्यात येणार आहे. तसेच शेतजमिनीच्या नुकसानीसाठी खरडून गेलेल्या जमिनीसाठी २० हजार रुपये प्रति हेक्टर, वाहून गेलेल्या जमिनीसाठी २५ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. शेतीपिके, फळपिके आणि शेतजमिनीच्या नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादीत राहणार आहे.
या मदतीशिवाय शेतकर्यांना जमीन महसुलात सवलत, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती, कर्जावरील व्याज तीन महिन्यांसाठी माफ, तिमाही वीज बिलात प्रशासकीय विभागाने निश्चित केलेल्या कालावधीसाठी माफी, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना फी माफी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.