किमान तापमान : 31.26° से.
कमाल तापमान : 33.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 31 %
वायू वेग : 1.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
33.99° से.
27.28°से. - 33.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश=अरुण जेटली यांचा आरोप=
नवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला चार दिवसच उरले असताना, आम आदमी पार्टीला मिळणार्या निधीवरून राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. आम आदमी पार्टी देणग्यांच्या माध्यमातून आपला काळा पैसा पांढरा करीत असल्याचा आरोप आवाम या स्वयंसेवी संस्थेने केल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या पक्षावर थेट हल्ला करताना, ‘आप’चा निधी हवालामार्गे आला असल्याची तोफ डागली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाला मिळणार्या निधीचा स्रोत जाहीर करावा, अशी मागणी जेटली यांनी केली आहे. तर, आवामने आज मंगळवारी पुन्हा एकदा आपवर ताशेरे ओढत, हा पक्ष आपला काळा पैसा देणग्यांच्या नावावर पांढरा करीत असल्याचा आरोप केला.
आवाम या संस्थेने मंगळवारी आयोजित एका पत्रपरिषदेत आपला देणगीरूपात मिळालेले धनादेशही दाखविले. केजरीवाल आणि त्यांच्या पक्षातील नेते मोठमोठ्या कंपन्यांना रोख रक्कम देत आहेत आणि त्यांच्याकडून मोठ्या रकमेचे धनादेश स्वीकारत आहेत, असा आरोप आवामने केला आहे.