किमान तापमान : 31.26° से.
कमाल तापमान : 33.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 31 %
वायू वेग : 1.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
33.99° से.
27.28°से. - 33.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, [५ फेब्रुवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आज गुरुवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी हजारो मतदारांशी संपर्क केला असून, आपण या निवडणुकीत पराभूत होण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी उतरल्याचा दावा केला आहे.
किरण बेदी गुरुवारी सकाळी प्रचारासाठी बाहेर पडल्या. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने पाच वाजण्यापूर्वी जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क करण्याचा सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रयत्न सुरू होता. वर्षभरात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ येऊ नये यासाठी दिल्लीच्या जनतेने मतदान करावे, असे आवाहनही बेदी यांनी केले. मी निवडणुकीत पराभूत होण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी आली आहे. मला इथे कुणीतरी जिंकण्यासाठी आणले आहे आणि देवाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, असे बेदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आपल्या प्रचाराच्यावेळी किरण बेदी यांनी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. केजरीवाल यांनी आधी ४९ दिवसात सत्ता सोडून पळ काढला आणि आता जनतेची माफी मागत फिरत आहेत. केजरीवाल नकारात्मक राजकारण करतात, असा आरोपही बेदी यांनी केला.
अरविंद केजरीवाल दिल्लीच्या जनतेची दिशाभूल करत आहेत. लोकांच्या भावना भडकवून मते प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचे हे मनसुबे दिल्लीची सामान्य जनता उधळून लावेल, असा दावाही किरण बेदी यांनी यावेळी केला.