किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल=अनुपम खेर यांची घणाघाती टीका=
नवी दिल्ली, [१९ मार्च] – देशविरोधात बोलणारे जेएनयूतील विद्यार्थी जामिनावर सुटल्यानंतर असे दणाणून सेलिब्रेशन करीत आहेत, जणू काही ते ऑलिम्पिक मेडलच जिंकून आले आहेत, अशी घणाघाती टीका करताना, कन्हैया, उमर खालिदने देशासाठी काय केले, असा स्पष्ट सवाल ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी केला आहे.
आपल्या ‘बुद्धा इन ट्राफीक जाम’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी विद्यापीठात आले असता त्यांनी या विद्यार्थ्यांचा सडकून समाचार घेतला.
देशविरोधी नारेबाजी प्रकरणात जामिनावर सुटलेल्या कन्हैय्या कुमारवर टीका करताना खेर म्हणाले की, तो काही ऑलिम्पिकमधून मेडल जिंकून आलेला नाही, त्याचं इतके भव्य स्वागत कशाला, जो देशविरोधात बोलतो, त्याला आपण हिरो कसे काय बनवू शकतो, तो काही सचिन, सायना किंवा हनुमंतअप्पा नाही, अशी परखड टीका त्यांनी केली. तसेच देशातील चुकीच्या गोष्टीवर टीका करण्याऐवजी देशासाठी तुम्ही काय केले, हा खरा सवाल आहे, असे ते म्हणाले.