किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल=‘विराट’ विजय=
कोलकाता, [१९ मार्च] – सध्या सुपर फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचे शानदार अर्धशतक (नाबाद ५५) आणि त्याने युवराजसोबत चौथ्या गड्यासाठी केलेल्या ६१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने चुरशीच्या व उत्कंठापूर्ण लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १३ चेंडू शिल्लक असताना सहा गड्यांनी पराभव करून टी-२० स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यात यश मिळविले. भारताने विजय मिळवताच देशभरात आनंदाला उधाण आले आणि एकच जल्लोष साजरा झाला.
बांगलादेशात झालेल्या आशिया चषकातही विराटने भारताला विजय मिळवून दिला होता. विराट कोहलीने ३७ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह नाबाद ५५ धावा केल्या. कर्णधार धोनीने नाबाद १३ धावा करताना टिपिकल हेलिकॉप्टर शॉट मारून पाकच्या धावसंख्येशी बरोबरी साधली आणि नंतर एक धाव घेऊन विजयावर शिक्कामोर्तब केले.
कोलकाता येथे सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे या सामन्यावरच संकटाचे ढग आले होते. परंतु, सामना सुरू होण्याआधी पाऊस थांबला. मात्र, मैदान ओले असल्याने पंचांनी सामना प्रत्येकी १८ षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला.
आयसीसीने आयोजित केलेल्या मोठ्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानकडून पराभूत न होण्याची मालिका भारताने कायम ठेवली. या सामन्यात विजय संपादन करून भारताने दोन गुणांची कमाई केली. पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेलेे ११९ धावांचे लक्ष्य भारताने १५.५ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
फलंदाजीसाठी अवघड असलेल्या खेळपट्टीवर रोहित शर्मा (१०), शिखर धवन (६) आणि सुरेश रैना (०) हे तीन खंदे फलंदाज अवघ्या २३ धावांमध्ये तंबूत परतल्यानंतर चाहत्यांना नागपूरच्या सामन्याची आठवण झाली. परंतु, विराटने युवराजच्या साथीने संयमाने फलंदाजी केली. विराटने लौकिकाला साजेशी फलंदाजी करताना संपूर्ण जगाला आपला दर्जा दाखवून देत चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. युवराजने विराटला दुसर्या टोकाने साथ देताना २३ चेंडूत २४ धावा केल्या.
रोहित बाद झाल्यानंतर मोहम्मद सामीने धवन (६) आणि रैनाला (०) लागोपाठच्या चेंडूवर क्लीन बोल्ड करून भारताला दोन धक्के दिले. परंतु, युवराजने सामीला हॅट्ट्रिकची संधी नाकारली.
तत्पूर्वी, महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्यानंतर पाकिस्तानने १८ षटकांत ५ बाद ११८ धावा फळ्यावर लावल्या. ईडन गार्डन्सची खेळपट्टी फिरकीला अनुकूल होती आणि वेगवान गोलंदाजांनी कटर्स टाकल्यास त्यांनाही मदत मिळत होती. त्यामुळे शर्जील खान व अहमद शहझाद यांना वेगाने धावा करता आल्या नाही. हार्दिक पंड्याने शर्जीलला (२४ चेंडूत १७) रैनाकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. बुमराने अहमद शहझादला करून पाकला दुसरा धक्का दिला. शहझादने २८ चेंडूत ३ चौकारांसह २५ धावा केल्या. तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला कर्णधार आफ्रिदी फार चमक दाखवू शकला नाही. पंड्याच्या गोलंदाजीत कोहलीने त्याचा झेल घेतला. परंतु, त्यानंतर उमर अकमल व शोएब मलिकने चौथ्या गड्यासाठी झटपट ४१ धावा केल्या. या दोघांनी हार्दिक पंड्या व जसप्रित बुमराने केलेल्या सुमार गोलंदाजीचा फायदा घेतला. अकमलने १६ चेंडूत २२, तर शोएब मलिकने ३ चौकार व एका षटकारासह २६ धावा केल्या. भारताकडून अश्विनने ३ षटकांत १२ धावा दिल्या. नेहरा, बुमरा, जडेजा, रैना व पंड्याने प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान १८ षटकांत ५ बाद ११८ (अहमद शहझाद २५, उमर अकमल २२, शोएब मलिक २६, जडेजा १-२०, आशीष नेहरा १-२०)
भारत : १५.५ षटकांत ४ बाद ११९ (विराट कोहली नाबाद ५५, युवराजसिंग २४, महेंद्रसिंग धोनी नाबाद १३, मोहम्मद सामी २-१७)
विराट कोहली -‘‘या खेळपट्टीवर खेळणे आव्हानात्मक होते आणि क्रिकेटपटू म्हणून अशा आव्हानात्मक स्थितीत खेळायला आवडते. नागपूरला ज्या पद्धतीने बाद झालो त्यामुळे खूप निराश होतो. आव्हानात्मक खेळपट्टी, दर्जेदार गोलंदाजी आणि संघ अडचणीत असताना विजयाचे स्वप्न पूर्ण केल्याचा मनापासून आनंद आहे. युवराजने वादळ शांत झाल्यावर आपला नैसर्गिक खेळ केला’’.