किमान तापमान : 28.5° से.
कमाल तापमान : 28.83° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.83° से.
27.34°से. - 30.71°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.15°से. - 29.76°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.65°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.1°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.59°से. - 30.7°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 30.37°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशम्हैसूर, [१९ मार्च] – कलेच्या सच्चा कलाकाराला कलेची साधना करत असताना मृत्यूने गाठावे याच्यासारखे दुसरे सौभाग्य नाही. बासरी वाजवून रसिकांवर सुरांची मोहिनी घालणारे विख्यात बासरीवादक एव्ही प्रकाश यांचे भरमैफिलीतच निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.
संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे एव्ही प्रकाश यांचा म्हैसूरमधल्या चंद्रमौलेश्वर मंदिरात बासरीवादनाचा कार्यक्रम होता. बासरीवादन सुरू असताना त्यांना दरदरून घाम फुटला आणि ते मंचावरच कोसळले. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मंचावर एव्ही प्रकाश यांच्यासोबत सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक एच के नरसिम्ह मूर्तीही कला सादर करत होते. विशेष म्हणजे रंगमंचावर कोसळण्यापूर्वी त्याही अवस्थेत त्यांनी व्हायोलिनवादक नरसिम्ह यांना वादन सुरूच ठेवण्याची विनंती केली, अशी माहिती एकाने दिली.
दरम्यान, एव्ही प्रकाश यांना राज्य तसेच केंद्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी गुरू एन रामानी यांची बासरीवादनाची विशिष्ट शैली जगात पोहोचवली. तसेच प्रकाश यांनी हजारो शिष्यांना बासरी वादनाचे धडे शिकविले आहेत.