किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=आपले ‘अच्छे दिन’ आल्याचा दावा=
अहमदाबाद, [१८ फेब्रुवारी] – इशरत जहॉं आणि सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आणि गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांना जामीन मंजूर झाल्यानंतर बुधवारी त्यांची साबरमती मध्यवर्ती तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. सुमारे साडेसात वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर वंजारा बाहेर आले आहेत.
मला स्वत:ला आणि गुजरातच्या पोलिस अधिकार्यांसाठी खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत, अशी प्रतिक्रिया वंजारा यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर बोलताना व्यक्त केली. राज्यातील पोलिस अधिकार्यांना राजकीय कारणांसाठी गोवण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला. देशातील प्रत्येक राज्याचे पोलिस अधिकारी दहशतवादाविरोधात लढतात. मात्र, आधीच्या सरकारने गुजरात पोलिसांना केवळ एक दिवस नव्हे, तर तब्बल आठ वर्षे जाणीवपूर्वक लक्ष्य केले. सर्वात जास्त चकमकी उत्तरप्रदेशात झाल्या आणि या यादीत गुजरात खालच्या क्रमांकावर आहे. मात्र, त्यानंतरही जाणीवपूर्वक गुजरात पोलिसांनाच लक्ष्य करण्यात आले, असा आरोपही वंजारा यांनी केल.
तत्पूर्वी, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या शेकडो समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. गेल्या ३ फेब्रुवारीला इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणात स्थानिक न्यायालयाने वंजारा यांना जामीन मंजूर केला होता. सोहराबुद्दिन शेख व तुलसी प्रजापती प्रकरणात मुंबईच्या न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता व सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तबही केले होते. गुजरात सोडण्याच्या अटीवर वंजारा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सीआयडीने २४ एप्रिल २००७ रोजी वंजारा यांना जामीन मंजूर केला होता.