किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसूरत, [१८ फेब्रुवारी] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नवी दिल्ली येथील भेटीदरम्यान परिधान केलेला बंद गळ्याचा आणि त्यांचे नाव असलेला वादग्रस्त सूटवर सूरतस्थित कापड व्यावसायिकाने तब्बल १.२१ कोटींची बोली लावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंसह इतर काही वस्तूंच्या तीन दिवसीय लिलावाला बुधवारपासून येथे सुरुवात झाली. यादरम्यान राजेश जुनेजा नावाच्या कपडा व्यावसायिकाने १.२१ कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली. तत्पूर्वी, विराल चौकसी नावाच्या गुजराती एनआरआयने पंतप्रधान मोदींच्या त्या सूटसाठी १.११ कोटींची बोली लावली होती. शिवाय सुरेश अग्रवाल नावाच्या आणखी एका व्यावसायिकाने या सूटसाठी एक कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली होती. सूरतस्थित पंकज नावाच्या सनदी लेखापालाने (सीए) ११ लाख रुपयांसह बोलीला प्रारंभ केला होता. मात्र, काही मिनिटातच राजू अग्रवाल नावाच्या इस्टेट डीलरने ५१ लाख रुपये मोजण्याची तयारी दर्शविली.
मी त्या सूटसाठी एक कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली होती. हे चॅरिटीचे काम आहे आणि पंतप्रधान मोदी गंगा नदी स्वच्छ करण्याच्या पवित्र कामासाठी हे करीत आहेत. त्यामुळे मी पुढे जाण्याचा निर्णय घेत सूट खरेदी करण्याचा निर्णय घेतला, असे अग्रवाल यांनी सांगितले.
ओबामा यांच्या भेटीच्या वेळी मोदी यांनी परिधान केलेल्या या सूटमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आपल्या आतापर्यंतच्या नऊ महिन्यांच्या कार्यकाळात मिळालेल्या सुमारे ४५५ भेटवस्तूंसह इतर काही वस्तूंचा लिलाव करून त्या माध्यमातून मिळणारा निधी स्वच्छ गंगा मिशनसाठी उपयोगात आणण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे, असे सूरत महापालिकेचे आयुक्त मिलिंद तोरावणे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. पंतप्रधान मोदींना भेट म्हणून मिळालेल्या वस्तू ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि या लिलावाच्या माध्यमातून उभारण्यात येणारा निधी क्लीन गंगा मिशनासाठी वापरण्यात येणार आहे, असेही तोरावणे यांनी सांगितले. सूरत महापालिकेच्या कन्व्हेंशन सेंटरमध्ये हा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही आपल्याला भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंचा लिलाव करायचे आणि त्या माध्यमातून प्राप्त झालेला निधी कन्या केलावाणी योजना अर्थातच मुलींच्या शिक्षणासाठी वापरल जात असे. पंतप्रधान मोदींच्या त्या सूटवर अत्यंत लहान अक्षरात नरेंद्र दामोदरदास मोदी अशी एम्ब्रॉयडरी केली होती.